हिमायतबाग ते दिल्लीगेट रोडवर पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनसेची मागणी

हिमायत बाग ते दिल्ली गेट रोडवर पाण्याची नासाडी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) दिनांक १७/०४/२०२५ वेळ दुपारी एक वाजता हर्सूल कडून शहागंज कडे येत असताना हिमायत बाग मेन रोड परिसर येथे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने रस्त्यावर किमान दोन ते तीन फरलांग लांब पर्यंत पाणी गळती होवून पाण्याची नासाडी होत आहे. रस्त्यावरील काही फळ व आईसक्रीम विक्रेत्यांना चौकशी केली असता या पाणी गळती वर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समजले एकीकडे आमचे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी साहेब, महानगर पालिका प्रशासक, पाणी पुरवठा अधिकारी व प्रशासकीय अधिकारी हे पाण्याचे धोरणावर बैठका घेत आहेत पाणी आडवा पाणी जिरवा धोरणावर हात पुढे करून संकल्प करीत आहे इकडे शहरात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नासाडी होत असलेल्या पाणी वाचविण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी नागरीक करत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशी नासाठी होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज या दिल्ली गेट ते हिमायत बाग रोडवर किती तरी प्रशासकीय अधिकारी यांची रेलचेल होत असते परंतु कोणत्याच प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा वार्ड झोन अधिकारी संबंधित पाणी पुरवठा अधिकारी ते प्रशासकीय कर्मचारी यांना कोणालाच पाणी गळती विषयी गांभीर्य दिसत नाही एकीकडे शहरातील घरांचे टॅक्स भरून भरून साधरण नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे तरी पंधरा दिवस पाणी नाही लोक पाण्याविना हतबल झाले आहेत यात शहरातील पाणी माफिया मात्र प्रशासनाच्या कृपा आशीर्वादाने फोफावत आहेत टँकरचे दर घंट्या घंटायला वाढत असुन शहरात पाणी माफियांचे चांगले भावात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना तर्फे जिल्हाधिकारी, महानगर पालिका प्रशासक व पाणी पुरवठा अधिकारी आपणास विनंती पुर्वक कळविण्यात येते की शहरात आपले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवसभर फिरतीवर पाठवून आपल्या शहरात पाण्याची गळती जिथे जिथे होत असेल तिथे ताबडतोब पाणी गळती रोखणारे कर्मचारी यांना पाठवून शहरात रोज लाखो लिटर पाण्याची गळती रोखण्यात यावी तसेच रोज लाखो लिटर पाणी गळती वर प्रशासनाचे धोरण ठरवून ही पाणी गळती थांबवावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर उतरुन मनसे स्टाइलने आंदोलन छेडण्यात येईल व याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा
अशोक पवार पाटील
जिल्हा संघटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना,
सतनामसिंग गुलाटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एडव्होकेट विनोद भाले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विधी व जनहित कक्ष, अशोक कराळे पाटील उपजिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर, शहर उपाध्यक्ष अमित जैस्वाल, शहर उपाध्यक्ष मोनु तुसे, शहर उपाध्यक्ष रुपेश शिंदे, विभाग अध्यक्ष रवींद्र गायकवाड, शहर उपाध्यक्ष सुरेंद्र वाडेकर, शहर उपाध्यक्ष जॉन बोरगे, विभाग अध्यक्ष मनोज भिंगारे यांची नावे आहेत.
What's Your Reaction?






