महापौर, विरोधीपक्षनेते यांनी ऐतिहासिक छावणी ईदगाहची केली पाहणी...

 0
महापौर, विरोधीपक्षनेते यांनी ऐतिहासिक छावणी ईदगाहची केली पाहणी...

महापौर व विरोधीपक्षनेते यांनी घेतला छावणी ईदगाहची पाहणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - ऐतिहासिक छावणी ईदगाहवर ईदची नमाज अदा करण्यासाठी लाखो भाविक येतात. येथे महापालिकेच्या वतीने सुविधा दरवर्षी उपलब्ध करून देण्यात येते. याची पाहणी करण्यासाठी आज दुपारी महापौर समीर राजूरकर, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान व महापालिका आयुक्त जी श्रीकांत आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. ईदगाहला ईदनिमित्त पाण्याची सुविधा, मंडप, मोबाईल टाॅयलेट, कार्डियाक रुग्णवाहिका, स्वच्छतेसाठी महापौरांनी यावेळी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या. याप्रसंगी नगरसेवक अब्दुल रशीद खान मामू यांनी आयुक्त जी श्रीकांत यांना माहिती दिली. याप्रसंगी ईदगाह कमेटीचे एम.ए. अजहर यांनी मान्यवरांचे शाल घालून सत्कार केला.

यावेळी नगरसेवक मीर वाजिद अली, काकासाहेब काकडे, अमजद चाचू, अतिक पालोदकर व महापालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow