विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रिक्षाचालक,कंत्राटी कामगार, पथ विक्रेते, विद्यार्थ्यांचे निवेदन
विरोधि पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना रिक्षाचालक, कंञाटी कामगार, पथविक्रेते, विद्यार्थ्यांचे निवेदन ! औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) सरकारी शाळा विकण्याचा निर्णय रद्द करा, शाळा कंञाटी भर्ती जी आर रद्द करा, कथित कंञाटी कामगारांना एकञित वेतनावर सामावुन घ्या, पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपञ द्या, वाहतुकीच्या पावत्यांची रक्कम कमी करा इत्यादि मागण्यांचे निवेदन आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे आम्ही इंडीया सोबत आहोत, इंडीयाच सरकार आल्यावर भाजपा सरकारने घेतलेले सर्व जनविरोधी निर्णय रद्द झाले पाहीजे याबाबत जनतेला आश्वासित करा असे आवाहन आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदने देतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना एका हाॅटेलमध्ये ते बैठकीसाठी आले असतांना निवेदन देऊन करण्यात आले. आयटक सलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन, लालबावटा रिक्षाचालक युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दिलेल्या विविध निवेदनात
आमची बाजू विधानसभेत मांडवी व सदर सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्यास शासनास भाग पाडावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथे मोफत औषधी, इन्जेक्शन, एम.आर.आय., सीटी स्कॅन इ. सुरु करावे. पुर्वी औषधे मोफत मिळत होती. परंतू सरकारने ती बंद केली. आता ती पूर्ववत मोफत औषधे तसेच एमआरआय, सीटी स्कॅन इ. मोफत करावे.
शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करणे तसेच कंत्राटी भर्तीचा जीआर रद्द करणे, कंत्राटी पोलीस भर्तीचा जीआर रद्द करणे .
केंद्र सरकारने लादलेल्या ऑनलाईन फाईनच्या रक्कमा तत्काळ कमी करा, पुर्वीचे फाईन रक्कम कायम ठेवा.
रिक्षासाठी पीकअप पॉइंट व ड्रॉप पॉइंट नसतांना प्रवाशी रिक्षात बसतांना व सोडतांना ऑनलाईन फाईन करणे बंद करा.
शहरात पुरेसे रिक्षा स्टॅण्ड घोषित करा.
रिक्षाचालकांच्या टॅक्सद्वारे जमा होणारे हजारो कोटी रुपये त्यांच्यावरच खर्च करा त्यासाठी रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
पेट्रोलचे भाव कमी करा, महागाई कमी करा, घाटी हॉस्पीटलचे खाजगीकरण रद्द करा, पुरेशा दर्जेदार सरकारी शाळा सुरु करा, वाळुज ते चिकलठाणा सिंगल पिलर उड्डाण पुल मंजुर करा व काम जी 20 च्या गतीने करा.
शासनाने आमच्या रिक्षा चालवायला घ्याव्या व त्याचा सर्व खर्च करावा व रिक्षा चालकांना त्यांची रोजची बचत द्यावी. तसेच नागरिकांना मोफत प्रवासाची सोय करावी. ज्यामुळे रोड मोठे करण्याची गरज पडणार नाही, वाहनांची संख्या कमी होईल, शासनाच्या आणि नागरिकांच्या पैशाची बचत होईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथिल एका कथित कंत्राटी कामगाराच्या नावे 15,000 रुपये दर महा शासनाच्या तिजोरीतून अदा केले जातात. त्यातील फक्त 7,000 रु. दरमहा कथित कंत्राटी कामगाराला दिले जातात.
अनेक वर्षांपासुन कायमस्वरूपी प्रकारची कामे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद, डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, सी.ई.टी.पी. प्लांन्ट एमआयडीसी, औरंगाबाद, महानगर पालिका औरंगाबाद इ. ठिकाणी कथित कंत्राटी पद्धतीने कामे करणार्या कामगारांना शासकीय सेेवेत पहिल्या टप्प्यात एकत्रित वेतनावर व त्यानंतर दुसर्या टप्प्यात वेतनश्रेणी लागू करावी. जेणेकरून शासनाच्या तिजोरीवरही ताण पडणार नाही व कामगारांचे शोषणही थांबेल.
हातगाडीवाला/पथविक्रेता या देशाचा नागरिक आहे, कष्ट करून पोट भरतो, तो गुन्हेगार हातगाडीवाल्याच्या पोटावर लाथ मारणे बंद करा.
कायद्याप्रमाणे वागा, विक्री प्रमाणपत्र द्या.. मा. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपी हातगाडीवाले/पथविक्रेत्यांची बाजू मांडा अन्यथा शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकऱ्या द्या..
विरोधीपक्ष नेते म्हणून आपण या कष्टकर्यांची बाजु मांडावी व आगामी निवडणुकीनंतर आपले सरकार आल्यानंतर सर्वप्रथम खालील मागण्या मंजूर कराव्यात, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. वडेट्टीवार यांनी शिष्टमंडळाला मुंबईला येण्याचे निमंञणही दिले. यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या महासचिव सुशिला मोराळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचे अॅड अभय टाकसाळ, अमोल सरोदे, कीरणराज पंडीत, सम्यक जमधडे, योगेश गरुड, योगेश साळवे, वसिम शेख यांनी वडेट्टीवार यांचेशी चर्चा केली.
What's Your Reaction?