हर्सुल तलावातून पाणी चोरणा-यांवर महापालिकेची धडक कारवाई...

 0
हर्सुल तलावातून पाणी चोरणा-यांवर महापालिकेची धडक कारवाई...

मनपाची पाणी चोरांविरोधात धडक कारवाई...

500 मिमी मुख्य जलवाहिनीवरील 19 अनधिकृत नळ जोडण्या खंडित

हर्सूल तलावातून पाणी चोरी करणारे पाईप जप्त

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. मनपाच्या विशेष शोध पथकाने जिन्सी पोलीस ठाण्यासमोर धडक कारवाई करत 500 मिमी मुख्य जलवाहिनीवरील 19 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या, तर हर्सूल तलावातून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्यांचे पाईप जप्त केले.

जिन्सी पोलीस ठाण्यासमोर 500 मिमी जलवाहिनीवर कारवाई

जिन्सी पोलीस ठाण्याच्या समोरील भागातून जाणाऱ्या 500 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृत नळ जोडण्या घेऊन मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असल्याची माहिती मनपा प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, नियमबाह्य जोडण्या आढळून आल्या. पथकाने तात्काळ कारवाई करत या मुख्य जलवाहिनीवरील सर्व 19 अनधिकृत नळ जोडण्या जागीच तोडून पाणी चोरी रोखली.

हर्सूल तलावातून पाणी उपसा करणाऱ्यांना दणका

दुसऱ्या एका धडक कारवाईत, हर्सूल तलाव परिसरातून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाने छापा टाकला. तलावातील पाणी चोरण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप मनपाच्या पथकाने जागीच जप्त केले. या कारवाईमुळे तलाव परिसरात बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही धडक मोहीम मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त-2 श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या कारवाईत कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता आनंद राजपूत, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अक्षय डुकले यांच्यासह अनधिकृत नळ शोध पथकातील कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.कारवाई आणखी तीव्र होणार आहे.शहरातील मुख्य जलवाहिन्यांवरून होणारी थेट पाणी चोरी, तलावांमधून बेकायदेशीर उपसा तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम मनपा प्रशासनाने दिला असून आगामी काळात ही शोधमोहीम संपूर्ण शहरभरात अधिक तीव्र केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आ

ले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow