हायड्रोलीक टेस्टींग न करता चंचु प्रयोगाने पाणी पुरवठा घाई घातक ठरेल - राजेंद्र दाते पाटील

 0
हायड्रोलीक टेस्टींग न करता चंचु प्रयोगाने पाणी पुरवठा घाई घातक ठरेल - राजेंद्र दाते पाटील

हायड्रोलीक टेस्टिंग न करता चंचु प्रयोगाने पाणी पुरवठा घाई घातक ठरेल - राजेंद्र दाते पाटील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- नक्षत्रवाडी ते हर्सूल 1500 मिमी पाइपलाइन द्वारे पाणी दाखल झाल्याचा गावगवा होत आहे परंतु हायड्रोलीक टेस्टिंग न घेणेअत्यंत चुकीचे असुन असे कुठलेही क्षणिक सुखाचे प्रयोग मनपा आणि नागरिकां साठी कायम स्वरूपी घातक तर ठरतीलच परंतु हायड्रोलीक टेस्टिंग न करता चंचु प्रयोगाने पाणी पुरवठा करण्याची घाई अधिक घातक ठरेल असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ जल अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे. 

मुबलक व वक्ताशीर पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी सर्व प्रथम जनहीत याचीका केली होती गेली तीन दशका पासुन ते लढा देत आहे हे विशेष होय.उलट हायड्रोलीक टेस्टिंग न करता ही योजना ताब्यात घेणे ही प्रक्रिया बारकाईने पाहिले नाही तर यातील गळतीचा शोध भविष्यात कधीच लागणार तर नाहीच उलट भविष्यात पाण्याचे प्रेशर मेंटेन न झाल्यामुळे पाईप लाईन फुटतील आणि मग याचा " ठिकरा " मनपा वर सतत फुटत राहील पर्यायाने पाणी पुरवठा विभागा वर राहील.

 हायड्रोलीक टेस्टिंग शिवाय मनपाने योजना ताब्यात घेऊ नये...

ही घाई म्हणजे " एका महिन्याची घाई,आयुष्यभर संकटात नेई " असे होणार हे निश्चित असुन उदाहरण द्यायचे झाल्यास जालना अंबड पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनला महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने घेतली पाईप लाईनचे आतुन अस्तरीकरण केले नव्हते.तीन वर्षानंतर जल वाहिनीला पत्रा पातळ होऊन छिद्र पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अशा प्रकारची घाई करणे अत्यंत चुकीचे आहे.लाभार्थी लोकांच्या " पाणी द्या पाणी द्या " या घाईमुळे ते तसेच राहून जाणार आहे. तीन वर्षानंतर जलवाहिनीला पत्रा पातळ होऊन छिद्र पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अशा प्रकारची घाई करणे अत्यंत चुकीचे आहे. घाई करूनही छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी भेटणार नाही हे विशेष ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नव्या पाणी पुरवठा योजनेची प्रत्यक्ष चाचणी यशस्वी झाली अशी घोषणा अयोग्य व अतांत्रिक ठरणारी असुन तीन दशकाच्या दीर्घ प्रतीक्षे नंतर अखेर नव्या योजनेचे पाणी शहरात दाखल झाले हे भासवण्याचा प्रयत्न म्हणजे ही योजनाच गर्ततेत आणण्याची सुरुवात झाली असे म्हणता येईल, म्हणुन सावध गिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागणार हे म्हणणे असत्य ठरेल...

सिडको एन-5 मधील पाणी टाकीत हे पाणी सोडून त्याचे वितरण सुरू केले असे म्हणणे म्हणजे सिडकोतील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागणार ही फक्त घोषणाचं ठरेल कारण नक्षत्रवाडी ते हर्सूल ही 1500 मिमी व्यासाची 17.90 किमी जलवाहिनी टाकण्यात आल्याचे सांगितले जात असुन त्यापैकी सिडको एन-1 मधील पिरॅमिड चौका पर्यंतची पाईप लाईन स्वच्छ करून तयार करण्यात आली हे म्हणण्या पूर्वी प्रशासनाने या पाईपची लाईनची हायड्रोलीक टेस्टिंगच केलेली नाही -अशा स्थितीत ही तांत्रिक चुक " गुत्तेदाराची "की "महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची "की "मनपाची "की सगळे चुपचाप सहन करणाऱ्या जनतेची...? असा महत्वाचा सवाल जेष्ठ जलअभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित केला आहे. नुकतेच 22 जुलै 2026 रोजी पिरॅमिड चौकातील व्हॉल्व्ह उघडून सिडको एन-5 च्या जलकुंभ 2 व 3 मध्ये पाणी सोडण्यात आले. यादरम्यान जुन्या योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याने नव्या योजनेतून मिळणारा हा पाणीपुरवठा अतिरिक्त असणार असल्याचा दावा केला गेला आहे.

लोक प्रतिनिधी आणि प्रशासनिक अधिकारी जे.व्ही.पी.आर या कंत्राटदाराचे प्रतिनिधी सुद्धा या वेळी उपस्थित होते.

पाणी 31 जुलै पर्यंत पोहोचण्याचा दावा...

तीन दशका नंतर शहरात नवीन पाणी योजना प्रत्यक्षात येण्यासाठी तीन दशके लागले असे म्हणत पाण्याची बेरीज दाखवताना 4 एमएलडी पाणी सध्या एन-5 मधील टाक्यात दररोज दिवसा तून तीन वेळा भरता येतील 1500 मिमी नक्षत्रवाडी ते हर्सूल टाकलेल्या मुख्य पाइपलाईनचा व्यास आहे.जास्तीत जास्त 35 एमएलडी पाणी एकावेळी जल वाहिनीतून पाणी पुरवठा होणार असे चित्र उभे होत असुन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पर्यंत 10 जलकुंभा पर्यत पोहचवण्याचे मनपा प्रशासनासचे लक्ष असल्याचे चित्र उभे होत असुन सावध पवित्रा बाळगून सन्माननीय न्यायालयाने अविरत केलेला पाठपुरावा प्रशासनाचे कळत असूनही अतांत्रिक प्रयत्न आणि गोरगरीब नागरिकांनी पाळलेला प्रचंड संयम यांची सांगड घालुन मनपा व प्रशासन काय संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे हेत्यांनाच ठाऊक एक दोन दिवस पाणी पुरवठा मागे पुढे होणे म्हणजे यशस्वी वाटचाल आहे असे कसे म्हणता येईल... ?असा महत्वाचा सवाल जेष्ठ जलअभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित केला आहे.

फक्त शक्यता वर्तविल्या जात आहेत...

विशिष्ट भागातील पाणी देण्याच्या स्थितीत या नवीन योजनेतून जास्तीचे पाणी उपलब्ध होईल हा दावा काय फक्त सात -आठ दिवसा आड होणाऱ्या पाणी पुरवठ्या च्या टप्यात एक ते दोन दिवसांची घट या साठी प्रशासन करत आहे काय? आणि ही प्रशासनाच्या वतीने फक्त शक्यता वर्तविली जात आहे असे स्पष्ट झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow