मेंटली डिस्टर्ब व्यक्तीने पोलिस आयुक्तांच्या गाडीची काच फोडली, पोलिसांनी घेतले ताब्यात

 0
मेंटली डिस्टर्ब व्यक्तीने पोलिस आयुक्तांच्या गाडीची काच फोडली, पोलिसांनी घेतले ताब्यात

मेंटली डिस्टर्ब व्यक्तीने पोलिस आयुक्तांच्या गाडीची काच फोडली, पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) मुकुंदवाडी भागातील एक मेंटली डिस्टर्ब व्यक्तीने पोलिस आयुक्तालयात आयुक्तांच्या गाडीची काच फोडली व मुख्य द्वाराची काच फोडल्याने खळबळ उडाली. या व्यक्तीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त नांदेडकर यांनी दिली आहे. विशाल म्हस्के असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पुढे सांगितले त्याने गाडीची व प्रवेश द्वाराची काच फोडली आहे. घटनास्थळी काचा व एक विट फोटोंमध्ये दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व त्या व्यक्तीला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आयुक्तालयात हा व्यक्ती कोणाला व कशासाठी भेटायला आला होता. आयुक्तालयात एवढा पोलिस बंदोबस्त असतानाही हि घटना कशी घडली हे चौकशीत निष्पन्न होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow