अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर विधानपरिषदेच्या मैदानात, महायुतीत मीठाचा खडा...?
आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र विधानपरिषदेच्या मैदानात, महायुतीत मीठाचा खडा...! शिवसेनेची बंडखोरी...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- महायुतीत औरंगाबाद जालना विधानपरिषदेची जागा भाजपाला सुटली आहे. भाजपाने जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असताना शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने या निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समीर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपिकडे मतदारांची संख्या जास्त आहे तर दुसऱ्या नंबरवर शिंदे सेनेचे मतदारांची संख्या असल्याने शिवसेनेची परंपरागत जागा यावेळी भाजपाने आपल्याकडे घेतल्याने शिंदे सेनेत नाराजी असल्याने समीरने आपला अर्ज दाखल केल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या वतीने एड देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज दाखल केला. एमआयएमनेही पहील्यांदाच आपला उमेदवार या निवडणुकीत उभा केला आहे. समीरने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही बंडखोरी केली तर हि निवडणूक अटीतटीची होईल व घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता आहे. बंडखोरी शमविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना यश मिळाले नाही तर या जागेवर काट्याची टक्कर होईल असे चित्र निर्माण होणार आहे. कारण माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जिल्ह्यात दबदबा आहे त्यांना या निवडणुकीत यश कसे मिळवायचे याचा अनुभव आहे. आता बघावे लागेल अब्दुल सत्तार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?