आमदार सतीश चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील - आमदार प्रशांत बंब
आमदार सतीश चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील- आमदार प्रशांत बंब
गंगापूर, दि.19(डि-24 न्यूज)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण महाराष्ट्रातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गंगापूर येथे आज महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगापूर – खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचे गंगापूरचे नगराध्यक्ष श्री.संजय जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक शेषराव जाधव, माजी संचालक नंदकुमार गांधीले, जि.प.समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, अनिल चव्हाण, जि.प.माजी सभापती संतोष जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष कल्याण गायकवाड, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणभाऊ सांगळे, प्रदीप सोनवणे, दादासाहेब जगताप, शुभम बोऱ्हाडे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष काळवणे, श्री.सुरेश शिंदे, गंगापूरचे उपनगराध्यक्ष अमोलदादा जगताप, भाजपा युवा मंचचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या सह तीनही पक्षाचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतांना आमदार प्रशांत बंब म्हणाले की, प्रत्येक बुथवर तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात मेहनत घेऊन जास्तीत जास्त मतदान आमदार सतीश चव्हाण यांना कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रचार कार्यात काही मदतीसाठी मला केंव्हा कॉल करा, मी उपलब्ध आहे असे सांगितले, तसेच आमदार सतीश चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे देखील ते म्हणाले.
याप्रसंगी गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, जि.प.सभापती बालाजी सोनटक्के, शेषराव जाधव, संतोष काळवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा, व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कल्याण गायकवाड यांनी मानले.
What's Your Reaction?