आवास योजना सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, लाभार्थ्यांना दिलासा...!
पंतप्रधान शहरी आवास योजनेसाठी सोडत मध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ... मुदतवाढ मिळाल्याने दिलासा...
रहीवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी असल्याने लागत होता उशीर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) - प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने शहरातील पाच ठिकाणी सदणिका बणवण्यात येणार आहे. यासाठी सन 2016 साली अर्ज केलेल्या ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे त्यांच्यासाठी 11120 सदणिका तयार करण्यात येणार आहे. या सदणिकेच्या विक्रिसाठी सोडत काढण्यात येणार आहे यासाठी अगोदरच चाॅईस अर्ज भरून घेतले जात आहे. ज्या लाभार्थ्यांना सोडत मध्ये सहभागी व्हायचे त्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उशिर लागत आहे व वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने नागरीकांनी मागणी केल्याने मनपा प्रशासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 23/12/2025 रोजी रात्री 11.59 वाजता हि मुदत संपणार होती आता हि मुदत 16 जानेवारी 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनामत रक्कम 19/1/2026 पर्यंत बँकेमार्फत भरता येणार आहे. मुदतवाढ दिल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मिळणा-या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आता वेळ मिळणार आहे.
यासंबंधी भडकलगेट येथील समाजसेवक अश्फाक अली यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मनपा प्रशासनाला प्रश्न विचारला की ऐन निवडणुकीपुर्वी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी सोडत काढण्यासाठी घाईघाईने ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उशिर लागत आहे व वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रतिसाद कमी मिळाला. हा निवडणुकीचा जुमला तर नाही ना...? म्हणून मुदतवाढ मिळाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. सदनिका विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली सदनिकेचे दर परवडणारे आहे का...? अडीच लाख शासनाचे अनुदान वजा करून दर प्रसिद्ध करण्यात आले आहे का...? सोडत मध्ये पात्र अर्जदाराचे नाव आले तर पैसे कसे भरायचे याची विस्तृत माहिती देण्यात आली नाही. लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सहकार्य करण्यात येईल का...? कीती वर्षांची फेड असेल असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संभ्रम दुर करावा अशी मागणी समाजसेवक अश्फाक अली यांनी केली आ
हे.
What's Your Reaction?