इम्तियाज जलिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी...

 0
इम्तियाज जलिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी...

इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी...

छत्रपती संभाजीनगर, दि.13 (डि-24 न्यूज) –

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

काल इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषद घेऊन जातीय द्वेषातून काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बदनामी केल्याचा आरोप केले आहेत म्हणून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या संदर्भात समितीचे अरुण बोर्डे व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे या पत्रकार परिषदेत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेबाबत काही कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.

यावेळी काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची नावे घेऊन जातीय हेतूने बदनामी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित बनावट कागदपत्रे दाखविण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. ही कागदपत्रे कुठून मिळाली याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रमाई आवास योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मनपाच्या घरकुल विभागाकडे सादर केले जातात. त्यानंतर संबंधित विभागाकडून पडताळणी करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. या प्रक्रियेशी आमचा कोणताही संबंध नसताना आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून जातीय भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना अनुसूचित जातीच्या मतदारांनी मतदान केले नाही व त्यांचा पराभव झाला होता यामुळे असे आरोप ते करत आहे असेही निवेदनात म्हटले आहे.

यामुळे इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर अरुण बोर्डे, अमित भुईगळ, महेंद्र सोनवणे, जालिंदर शेंडगे, रूपचंद वाघमारे, राहुल सोनवणे व अनिल पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow