एकता एज्युकेशन, कल्चरल सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
एकता एज्युकेशन कल्चरल सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
संस्थापक अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज) — एकता एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी, औरंगाबाद संचालित विविध शाळांमध्ये देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लासगाव : एकता एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचालित हाजी अ. बशीर देशमुख मेमोरियल उर्दू हायस्कूल, लासगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. डॉ. हादी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
उत्राण : हाजी लालमिया देशमुख उर्दू हायस्कूल, उत्राण येथेही 15 ऑगस्टनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री. जाकिर शेख हुसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना भारत हा आपला देश असून भारतीय असणे हा प्रत्येकासाठी अभिमानाचा विषय आहे. विविधता आणि एकात्मता जपणारा भारत हा महान देश असून देशाची प्रगती व विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अन्वा : तालुका भोकरदन येथील अब्दुल शकुर देशमुख उर्दू हायस्कूल, अन्वा येथेही स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
एकता एज्युकेशन कल्चरल सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा
वाढवली.
What's Your Reaction?