एसटी महामंडळ पतसंस्थेच्या निवडणुकीत एड गुणरत्न सदावर्तेंचा पॅनल
 
                                एसटी महामंडळ पतसंस्थेच्या निवडणुकीत एड गुणरत्न सदावर्तेंचा पॅनल
छत्रपती संभाजिनगर(डि-24 न्यूज) 20 मे रोजी होणा-या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सि सि एस पतसंस्था(मराठवाडा) या बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एसटि कष्टकरी जनसंघाच्या वतीने मराठवाड्यात संस्थापक एड गुणरत्न सदावर्ते यांनी आपले पॅनल उभे केले आहे. आज शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत एड गुणरत्न सदावर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष एड डाॅ.जयश्री पाटील यांनी हि माहिती दिली. सदावर्ते यांनी सांगितले एकूण सदस्य संख्या 64 हजार आहे. संचालक पदासाठी जनसंघाचे जे उमेदवार या निवडणुकीत उभे आहे त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आलो आहे. आमचा पॅनल या निवडणुकीत विजयी होईल व कर्जावर असलेला व्याज कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष अजित मगरे व उमेदवार उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            