महापालिकेत डेंग्यु दिन उत्साहात साजरा...

 0
महापालिकेत डेंग्यु दिन उत्साहात साजरा...

महानगरपालिकेत डेंग्यु दिन उत्साहात साजरा...

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)

16 मे 2025 रोजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व मलेरिया विभागामार्फत आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय डेंग्यु दिवस साजरा करण्यात आला.

सन 2025 या वर्षाच्या राष्ट्रीय डेंग्यु दिवसाचे घोषवाक्य खालीलप्रमाणे आहे:

“तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा: डेंग्युला हरविण्याचे उपाय करा”

“Check, Clean, Cover: Steps to Defeat Dengue”

डॉ. पारस मंडलेचा (वैद्यकीय आरोग्य अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली सिडको एन-8 रुग्णालय येथे डेंग्यु विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अर्चना राणे (सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवशास्त्रज्ञ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात प्रामुख्याने डासाचे जीवनचक्र व उपयुक्त माहिती देण्यात आली.

यामध्ये डेंग्युसाठी जबाबदार डास, डेंग्यूसाठी प्रतिबंधात्मक उपाय, गप्पी मासे दाखविण्यात आले व नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.

“आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा” असे आवाहन करण्यात आले.

डेंग्यु डास स्वच्छ व साठलेल्या पाण्यात उत्पत्ती करतो, म्हणून पाणी साठविण्याची भांडी, मडके, टाक्या, हौद यांना आठवड्यातून एकदा स्वच्छ व कोरडे करून झाकण लावणे, पाण्याच्या साचलेल्या/तुंबलेल्या जागा नष्ट करणे, पाणी वाहते ठेवणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच प्रदर्शनात हत्तपिसक्यांचे (हँडबिल्स/पाम्फ्लेट्स) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये डॉ. आदित्यकुमार जोशी, डॉ. देवधर, श्री. के. बी. मोरे, श्री. राहुल चाहाण, कीटक नियंत्रण अधिकारी श्री. मिलिंद जबांगी, श्री. कोथळकर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमात सिडको एन-8 हॉस्पिटलचा स्टाफ, एमजीएम निसर्ग कॉलेजचे विद्यार्थी, मलेरिया कर्मचारी व नागरिक यांनी डेंग्यु विरोधात सहभाग घेतला.

महानगरपालिकेतील सर्व मनपा रुग्णालये व आरोग्य केंद्रात गटसभा, डेंग्यु प्रतिकार आणि हत्तपिसक्यांचे वाटप करून 16 मे राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow