ऐका फडणवीस माझे नाव घेतले जरांगेंचे नाव घेऊन दाखवा - ओवेसी

 0
ऐका फडणवीस माझे नाव घेतले जरांगेंचे नाव घेऊन दाखवा - ओवेसी

ऐका फडणवीस माझे नाव घेतले जरांगेंचे नाव घेऊन दाखवा - ओवेसी

धर्मयुद्ध, वोट जिहादचे वक्तव्य केले जात आहे निवडणूक आयोग काय करत आहे....ओवेसींचा सवाल...बायजीपूराच्या जाहिर सभेत विरोधकांवर भडकले ओवेसी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) काल बजरंग चौक येथील जाहीर सभेत ओवेसी बंधूंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला होता. आज सायंकाळी बायजीपूरा येथे झालेल्या जाहीर सभेत बॅ.खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी प्रत्यूत्तर दिले. फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांचे जाहीर सभेत नाव घ्यावे तर म्हणेल. फडणवीस त्यांना घाबरतात. आमदारांची फोडाफोडी करुन खरेदी केली तर फडणविसांना डाकू म्हणायचे का...? मुख्यमंत्री बणण्यांचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळतील ते कधीच मुख्यमंत्री बणणार नाही. ते आपल्या भाषणात वोट जिहाद, धर्मयुद्ध या शब्दाचा वापर करत आहे हे आचारसंहितेचा भंग नाही का...? निवडणूक आयोग गप्प का... कारवाई करणार का...? असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. देशातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावली. ज्या धुळे व मालेगावात यांना मते मिळाली नाही म्हणून ते वोट जिहाद म्हणत आहेत त्या मालेगावचा इतिहास फडणवीस यांना माहित आहे का...? सन 1818 मराठा व इंग्रजांच्या युध्दात आमचे पुर्वज मराठांच्या सैन्यात होते. मालेगावच्या किल्ल्यावर चढून त्यांनी शत्रुंचा मुकाबला केला आणि शहीद झाले. 1921 साली किल्ल्यावरुन इंग्रजांचा झेंडा काढून विजय मिळवला. कधी जमिन जिहाद, कधी लव्ह जिहाद आता वोट जिहाद यांनी आणला. दोन समाजात तेढ निर्माण करुन सत्तेवर येण्यासाठी यांचे प्रयत्न हाणून पाडा. गुजरातमधील एक जागा, हैदराबाद येथील माझी जागा व अयोध्येत यांना मते मिळाली नाही तर हे वोट जिहाद झाले का...?  

औरंगाबाद पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघात यांनी काही उमेदवार मतविभाजनासाठी दिले. ते प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात गरळ ओकणा-यांचे एजंट आहे. त्यांना ओळखा. जे उमेदवार एमआयएमला पाडण्यासाठी उभे राहिले त्यांचे मनसुबे ओळखा व त्यांना त्यांच्या उद्देशात यशस्वी होऊ देऊ नका. मतांचा टक्का वाढवा. पूर्वच्या आमदारांनी विशिष्ट समाजाच्या वार्डात विकासकामे केली नाही. खासदार असताना इम्तियाज जलील यांनी अनेक विकासकामे मार्गी लावले. आपले प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी बोलणारे आमदार पाठवा. असे कळकळीचे आवाहन ओवेसींनी केले. या निवडणुकीत एमआयएमचा पराभव करण्यासाठी उभे असलेले अबु जहेल, मीर जाफर, मीर सादीक यांना ओळखा व त्यांचा पराभव करा असे आवाहन सुध्दा या जाहीर सभेत त्यांनी केले. यावेळी इम्तियाज जलील यांनी विरोधकांवर टीका करत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. व्यासपीठावर माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक अयूब खान यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow