जलसंधारण सप्ताह, "गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार" योजनेमुळे जिल्ह्यातील 3314 शेतकऱ्यांची 304 हेक्टर जमीन सुपीक...

 0
जलसंधारण सप्ताह, "गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार" योजनेमुळे जिल्ह्यातील 3314 शेतकऱ्यांची 304 हेक्टर जमीन सुपीक...

जलसंधारण सप्ताहः ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेमुळे...

जिल्ह्यातील 3314 शेतकऱ्यांची 304 हेक्टर जमीन सुपीक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 19 (डि-24 न्यूज)- जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' या योजनेच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात 304 हेक्टर जमीन सुपीक झाली आणि त्याचा तब्बल 3314 शेतकऱ्यांना लाभ झाला,अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके यांनी दिली आहे. 

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तलाव, बंधारे आणि नाल्यांमधील गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढवणे आणि तो गाळ शेतात टाकून जमिनीची सुपीकता सुधारणे हा आहे.

  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या योजनेतच्या 302 कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी 255 कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. या अभियानात जिल्ह्यात 36.38 लक्ष घ. मी. गाळाचा उपसा झाला आहे.हा गाळ 304 हेक्टर शेतजमिनीवर पसरण्यात आला. त्याचा लाभ 3314 शेतकऱ्यांना झाला.

योजनेचे स्वरुपः ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, या योजनेंतर्गत गाळ वाहून नेणाऱ्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना प्रती एकर 35.75 रुपये प्रति घनमीटर याप्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच 37 हजार 500 रुपये (जास्तीत जास्त) देय राहते. 'नाला खोलीकरण व रूंदीकरण' या योजनेंतर्गत गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री व इंधन खर्च यासाठी राज्य शासनाकडून स्वयंसेवी संस्थांना 37.75 रुपये प्रति घनमिटर या दराने मोबदला अदा केला जातो.

धरणांमधील किंवा जलसाठे, नाल्यांमधील गाळ काढल्याने साठ्याची जलसाठवण क्षमता वाढते. भुमिगत पाझर सक्रिय होऊन भूजल पातळी उंचावण्यास मदत होते. भुमिगत जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन होते. शिवाय गाळ शेतजमिनीत टाकल्याने जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते. मातीतील सुक्ष्मजीवांचे संवर्धन

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow