कचरा प्रक्रिया केंद्रातील केमिकल युक्त पाण्याने हर्सुलच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, एमआयएमचे 15 दिवसांचे अल्टिमेटम...
कचरा प्रक्रिया केंद्रातील केमिकल युक्त पाण्याने हर्सुल वासी यांचे आरोग्य धोक्यात...!
15 दिवसांत पाणी काढण्याची एमआयएमच्या नगरसेवकांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 1 हर्सुल येथील कचरा प्रक्रिया केंद्र व त्यापासून निघणाऱ्या केमिकल युक्त पाण्याने हर्सुलच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील बोरला अशुद्ध पाणी येत असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. 15 दिवसांत या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी प्रभागातील एमआयएमचे नगरसेवकांनी केली आहे.
एमआयएमचे प्रभागातील नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांनी तेथे जाऊन आढावा घेतला या केमीकलयुक्त पाण्याची विल्हेवाट मनपा प्रशासनाने लावली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथून कचरा संकलन केंद्र हटवण्याची मागणी गावातील रहीवाशांची आहे. अगोदर या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावावी यानंतर शहरातून दहा किलोमीटर अंतरावर जेथे लोकांची वस्ती नाही तेथे कचरा संकलन व प्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी एमआयएमचे नेते युनुस पटेल, नगरसेवक अजहर पठाण, नगरसेवक अशोक हिवराळे यांनी केली आहे.
प्रभागातील नगरसेवकांना मागिल काही वर्षांपासून दुर्गंधीयुक्त वासामुळे श्वास घेण्यास त्रास व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएमने हर्सुल येथील कचरा प्रक्रिया केंद्र हटवण्याचे आश्वासन दिले होते ते आतापर्यंत पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असल्याने नगरसेवक मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे, बाळासाहेब औताडे व हर्सुल येथील नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?