राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा - अंबादास दानवे

 0
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा - अंबादास दानवे

“राजा शिवाजी” चित्रपट करमुक्त करा...

शिवसेना नेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

मुंबई, दि.4(डि-24 न्यूज)- : शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिनेता श्री. रितेश देशमुख लिखित - दिग्दर्शित “राजा शिवाजी” हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास हा राज्याच्या अस्मितेशी निगडित आहे. “राजा शिवाजी” या चित्रपटातून त्यांच्या कार्याची प्रभावी मांडणी होत असून, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होईल, असे दानवे आपल्या पत्रात म्हटले आहे.

अशा ऐतिहासिक विषयावरील चित्रपट समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी करमुक्ती देणे आवश्यक असल्याचेही अंबादास दानवे यांनी अधोरेखित केले आहे.

राज्य शासनाने या मागणीचा विचार करून संबंधित विभागांना योग्य त्या सूचना लवकर द्याव्यात, अशीही मागणी अंबादास दानवेंनी पत्राद्वारे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow