पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी जाचक अटी रद्द करा, आझाद समाज पार्टी व वंचित अक्रामक...
पंतप्रधान आवास योजनेसाठी जाचक अटी रद्द करा, आझाद समाज पार्टी, वंचित अक्रामक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - शहरातील पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करुन सवलतीच्या दरात घरकुल उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीने महापालिकेत उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे यांची भेट घेतली व पात्र लाभार्थ्यांच्या व्यथा मांडली. याप्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही थेटे यांच्यासोबत बैठक घेऊन लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन कर्ज प्रकरण मंजूर करून त्यामधून दहा टक्के रक्कम वसूल करावी व कर्ज प्रकरण मंजूरीसाठी सहकार्य करावे असे आदेश दिले.
शहरात पडेगाव, हर्सुल, तीसगाव, सुंदरवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी घरकुलाच्या इमारतींचे बांधकाम सुरू केले आहे. 11120 सदनिका बनवले जात आहे. यापैकी 5000 लाभार्थी ड्रा मध्ये पात्र ठरले आहे. पात्र लाभार्थ्यांना दहा टक्के रक्कम 22 मे पर्यंत भरण्याचे फर्मान महापालिका प्रशासनाने काढले होते. एका सदनिकेची किंमत काही ठिकाणी साडेनऊ लाख तर काही ठिकाणी साडे अकरा लाख रुपये आहे. पंतप्रधान आवास योजनेचे यामधून अडीच लाख रुपये वजा होणार आहे परंतु अनामत रक्कम दहा टक्के अगोदर भरावे असे आदेश मनपा प्रशासनाने काढल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. आझाद समाज पार्टीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे व शहर उपाध्यक्ष सारिका जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी महापालिकेत धडक दिली. घरकूलसाठी जाचक अटी रद्द करा व सवलतीच्या दरात पंतप्रधान आवास योजनेचे घर द्यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली. लाभार्थ्यांचे उत्पन्न तीन लाखाहुन कमी आहे त्यांना बँकेकडून कर्ज मिळणे कठीण आहे. काही लाभार्थ्यांचे वय जास्त आहे त्यांना कर्ज कोण देणार, घराचा ताबा मिळाल्यानंतर कर्जाचे हप्ते सुरू करावे, पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख व कामगार नोंदणी असेल त्यांना दोन लाख असा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिल्यास पैशांचा भार कमी होईल अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली
.
What's Your Reaction?