न्यू हनुमान नगरच्या मराठा समाजाचा अतुल सावे यांना पाठिंबा
न्यू हनुमान नगरच्या मराठा समाजाचा अतुल सावे यांना पाठिंबा..
विकासकामांसाठी घेतलेली पुढाकाराची पोचपावती..
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) न्यू हनुमान नगरच्या मराठा समाजाने महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मागील दशकभराच्या काळात अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली गारखेडा परिसरातील अनेक महत्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या कामांची पोचपावती देत मराठा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत श्री सावे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाच्या वतीने श्री अनुराग सावे यांना पाठिंबा पत्र गुरुवारी सुपूर्द करण्यात आले, ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतुल सावे यांच्या भरीव प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. परिसरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या सुविधांमध्ये झालेली सुधारणा ही सावे यांच्या विकासविषयक दृष्टिकोनाची साक्ष देते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आशादायक वातावरण तयार झाले आहे.
यावेळी रामेश्वर सोनवणे पाटील, सुनील लुटे पाटील, रामेश्वर बोडखे पाटील, हरिश्चंद्र भोसले पाटील, गजानन मदन पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण पाटील यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकल मातंग समाज, सकल धनगर समाज, अर्जुनअस्त्र फाउंडेशन, सह्याद्रीचा छावा संघटना, सकल धनगर मल्हार सेना, संभाजी सेना संघटना, छावा मराठा संघटना, आदींनी देखील पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांना जाहीर पाठिंबा दर्श
विला आहे.
What's Your Reaction?