काँग्रेसची शहरात लोकशाही वाचवा अभियानांतर्गत ब्लाॅकस्तरीय पदयात्रा व जनसंपर्क अभियान
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोकशाही वाचवा अभियानांतर्गत ब्लॉकस्तरीय पदयात्रा व जनसंपर्क अभियान
शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांत पदयात्रा व जनसंपर्क; बेगमपुरा येथे समारोप
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- लोकशाही वाचवा अभियानांतर्गत ब्लॉकस्तरीय पदयात्रा व जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत नागरिकांशी संवाद साधत लोकशाही मूल्ये जपण्याचा आणि जनजागृती करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या पदयात्रेची सुरुवात गुलमंडी ब्लॉक, मिल कॉर्नर ब्लॉक व हर्सूल ब्लॉक अंतर्गत पैठण गेट येथून होऊन टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौक, मिल कॉर्नर आणि टाऊन हॉल मार्गे बेगमपुरा येथे समारोप झाला. या मार्गावरील विविध भागांत जनसंपर्क साधून नागरिकांपर्यंत अभियानाचा उद्देश पोहोचविण्यात आला.
या अभियानात इक्बालसिंग गिल, हसीनबानो पटेल, चंद्रप्रभा खंदारे, हाजी मोईन कुरेशी, गणेश जाधव, रामभाऊ लोखंडे, मोहम्मद जाकीर, निलेश आंबेवडीकर, संजय धर्मरक्षक, असदउल्ला शकील, मुनीर पटेल, कैसर बाबा, सय्यद लाइक, अस्मत खान, अनिल पारखे, नदीम सौदागर, सय्यद शब्बीर, विशाल राठोड, योगेश थोरात, किशोर चावरीया, इरफान पठाण, साजिद कुरैशी, गाझी सलाउद्दीन, अश्फाक सिद्दिकी, सय्यद फयाजुद्दीन आणि शेख जमील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
लोकशाहीचे संरक्षण, नागरिकांमध्ये जनजागृती आणि जनतेशी थेट संवाद साधणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम
म्हणाले.
What's Your Reaction?