गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 11 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

 0
गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 11 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; 11 लाख 52 हजार 764 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बिडकीन पोलिसांची मोठी कारवाई; लोणगाव-बिडकीन रोडवरील तोडोळी गावाजवळ सापळा रचून केली कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डि-24 न्यूज) :- प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणगाव-बिडकीन रोडवरील तोडोळी गावाजवळ सापळा रचून पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली किया सेल्टॉस कार असा एकूण 11 लाख 52 हजार 764 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना बिडकीन हद्दीत प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर 2026 रोजी लोणगाव-बिडकीन रोडवरील तोडोळी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

दुपारी सुमारे 1.20 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची किया सेल्टॉस कार येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम आढळून आले. त्यांची नावे सुनील जयराम ढोले (वय 33, रा. टेंभापुरी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अलीम अहमद पटेल (वय 30, रा. जिकठाण, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.

वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंध असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील :

प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला – 456 पाकिटे, किंमत 68 हजार 400 रुपये.

ZN-01 जापानी जर्दा सुगंधित तंबाखू – 456 पाकिटे, किंमत 41 हजार 40 रुपये.

हिरा पान मसाला – 216 पाकिटे, किंमत 27 हजार 216 रुपये. उत्पादक – Y.K. Packers, निपाणी, कर्नाटक.

रॉयल 717 टोबॅको सुगंधित तंबाखू – 216 पाकिटे, किंमत 13 हजार 608 रुपये.

विमल पान मसाला – 105 पाकिटे, किंमत 50 हजार 400 रुपये. उत्पादक – Vibrant Products, वसाड, गुजरात.

V-1 बिग सुगंधित तंबाखू – 105 पाकिटे, किंमत 2 हजार 100 रुपये.

किया कंपनीची सेल्टॉस कार – अंदाजे किंमत 9 लाख 50 हजार रुपये. वाहनाचा चेसिस क्रमांक MZBEN813LSN725784 असा आहे.

अशा प्रकारे प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 11 लाख 52 हजार 764 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 716/2026 नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 275, 123, 223 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow