खोटे नगरसेवक म्हणून मेलट्राॅन रुग्णालयात दमदाटी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...!
खोटे नगरसेवक म्हणून स्टाफला दमदाटी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10 (डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या एन-8 हॉस्पिटल व मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे स्वतःला नगरसेवक म्हणून भासवून स्टाफला दमदाटी करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इमरान सालार (रा. बुडीलेन) व स्विकृत सदस्य म्हणून अर्ज सादर केलेले अजून निर्णय झालेला नाही असे असरार अहमद (रा. किराडपुरा) अशी संबंधित इसमांची नावे आहेत. संबंधित दोघांनी आज सकाळी सुमारे 11 ते दुपारी 2.15 वाजेपर्यंत एन-8 हॉस्पिटल येथे बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत उपस्थित राहून स्वतःला नगरसेवक असल्याचे सांगत डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली तसेच कामकाजाबाबत चौकशी केली.
या दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या वर्तनाची नोंद घेण्यासाठी फोटो व व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित इसमांनी त्यास विरोध करून चित्रिकरणास मज्जाव केला.
यानंतर दोघांनी दुपारी 3 ते सायंकाळी सुमारे 6.45 वाजेपर्यंत मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे थांबून डॉक्टर व स्टाफकडे स्टॉक रजिस्टर दाखविण्याची मागणी केली. स्टॉक रजिस्टर ताब्यात घेतल्यानंतर त्यातील संपूर्ण नोंदींची झेरॉक्स प्रत बाहेरून काढण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
सदर इसमांनी सहकार्य न केल्यास डॉक्टरांना निलंबित करण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, या काळात हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी 15 महिला रुग्ण दाखल होत्या, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित दोघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांपैकी एकाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मोबाईल वरती कॉल करून श्री शैलेश लोहाडे यांना सांगितले की, "यह ये कौन्सी बत्तमीज सिस्टर रखी है. इसको यहा से हटाव." याप्रकारे वक्तव्य केले व महिलांना अपमान होईल अशोभनीय वर्तन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
What's Your Reaction?