बुलेट मधून कर्णकर्कश आवाज करणा-या सायलेंसरचा पोलिसांनी केला चुराडा...!

 0
बुलेट मधून कर्णकर्कश आवाज करणा-या सायलेंसरचा पोलिसांनी केला चुराडा...!

दुचाकीतून कर्णकर्कश आवाज करणा-या सायलेंसरचा पोलिसांनी केला चुराडा...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी विरोधात धडक मोहीम राबवली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले तब्बल 705 बदललेले सायलेंसर आज पोलीस मुख्यालयात रोड-रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार मार्च महिन्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान 1028 बुलेटसह इतर दुचाकींवर कारवाई करण्यात आली. वाहनांच्या मूळ सायलेंसरमध्ये फेरफार करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर लक्ष केंद्रित करत ही कारवाई करण्यात आली होती.

जप्त केलेले सर्व सायलेंसर आज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. या कृतीतून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

याशिवाय, असे सायलेंसर बसवणाऱ्या मेकॅनिक व गॅरेज चालकांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून शांततेला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow