63 लाख रुपयांचा गुटखा पकडला, गुन्हे शाखेची कार्यवाई...

प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला...
63 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा गुन्हेशाखेने केला पकडला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -
प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या साठ्याची वाहतूक करणारा ट्रक गस्तीवरील गुन्हेशाखा पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी 63 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी आज दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनेसिंग बाबूलाल कटारिया (वय 37 वर्ष), राहणार बडागाव, नलखेडा, जिल्हा अगर मालवा, शाजापूर असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. गुन्हेशाखेचे पथक 21 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास धुळे- सोलापूर हायवेवरील करोडी टोलनाक्याजवळ गस्तीवर असतांना ट्रक क्रमांक DD-01-G-9092 हा संशयास्पदरित्या जातांना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालक बनेसिंग कटारिया याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, अमरावती येथून मुंबई येथे गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा घेवून जात असल्याचे ट्रकचालकाने सांगितले.
पोलिसांनी ट्रकमधून 56 लाख 25 हजार रुपये किंमतीचा बाजीराव गुटखा, 6 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मस्तानी जर्दा असा एकूण 63 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा, आणि वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 83 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक बनेसिंग कटारिया याच्याविरुध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, पोलिस अंमलदार सतीश हंबर्डे, संतोष भानुसे, शैलेश आस्कर, यशवंत गोबाडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने केली.
What's Your Reaction?






