गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन...
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे जोरदार आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष मा.आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन - निदर्शने करण्यात आले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, होश मे आओ - होश मे आओ मोदी सरकार अशा अनेक, जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला तसेच छोटे व्यावसायिक यांचे आर्थिक गणित बिघडले असून वाढती महागाई लक्षात घेता गॅसच्या किमती तात्काळ कमी कराव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सध्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मोठ्या संकटाचा सामना करत आहे. केंद्रातील सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली असून त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडू दिला नव्हता, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 1900 रुपयांपर्यंत पोहोचली असून त्यामुळे हॉटेल, खानावळ तसेच खाद्यपदार्थ बनविणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. परिणामी खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लागणारा कालावधीही वाढल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने वाढविलेल्या गॅसच्या किमती तात्काळ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, मा.आ. नामदेवराव पवार, प्रदेश पदाधिकारी ॲड. संदीप पाटील, अशोक डोळस, जगन्नाथ काळे, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब जगताप, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष दिपाली मिसाळ, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, अनिस पटेल, डॉ. पवन डोंगरे, गौरव जैस्वाल, भास्कर घायवट, इंजि. इफ्तिकार शेख, अभिषेक शिंदे, योगेश थोरात, उपाध्यक्षा सरोज जेकब, अनिता भंडारी, शीला मगरे, उषा पगारे, संगीता तायडे, निर्मला शिखरे, मंजूताई लोखंडे, प्रियांका खरात, राहुल सावंत, दिलीप भोसले, शफिक शहा, राहुल संत, डॉ. सिकंदर शेख, सलीम पटेल, जंगले पाटील, प्रकाश सानप, रमेश मुळे, शेख फिरोज, जयपाल दवणे, मुनीर पटेल, कय्युम पटेल, शुभम साळवे, सोमीनाथ पळसकर, उत्तम दणके, शाहिद खान, संतोष मेटे, सृजन गावंडे, अजिनराव शिंदे, रवी लोखंडे, रमेश अहिरे, विनोद देहाडे, सतीश चाबुकस्वार, सय्यद साजिद अली यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?