नेते आमीनभाई जामगांवकर यांच्या निधनाने भटके विमुक्तांचा आधारवड गेला...!
नेते आमीनभाई जामगांवकर यांच्या निधनाने भटके विमुक्तांचा आधारवड गेला...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे भटके विमुक्तांचे नेते तथा आधारवड आमिनभाई जामगांवकर(वय 53) यांचे सोमवारी उशिरा रात्री एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने शोककळा पसरली. जेष्ठ समाजसेवक स्व. मोतीराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तोताराम राठोड यांच्या सोबत अनेक आंदोलनात भटके विमुक्तांच्या उद्धारासाठी ते जीवनभर झटले. राज्यात निस्वार्थ भावनेने भटके विमुक्त चळवळीत ते काम करत असताना गांव खेड्यात तांड्यावर जाऊन भटके विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत होते. त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा सोशलमिडीयावर झळकली भटके विमुक्तांचे आधारवड गेले अशी भावना व्यक्त केली जात आहे. भटके विमुक्तांना, आदीवासिंना घर मिळावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते शासन दरबारी नेहमी स्व.मोतीराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करत असे. शिवाजीनगर येथे त्यांचे निवासस्थान होते तर किराडपुरा येथे संपर्क कार्यालय होते. राज्यातील भटके विमुक्त यांना एकत्रित करून दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन साजरे करुन त्यांचे प्रश्न मांडत असे अशी माहिती जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांनी दिली आहे. त्यांचा दफनविधी आज मंगळवारी सकाळी 10.30 वाजता इंदिरानगर गारखेडा येथील कब्रस्तानात संपन्न झाला यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नाती पोती असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?