जेष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम यांचे दु:खद निधन, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात शोककळा
जेष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम यांचे निधन दु:खद निधन, पत्रकारीत व सामाजिक क्षेत्रात शोककळा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- आज सकाळी दु:खद बातमी मनाला चटका लावून गेली आहे. साप्ताहिक औरंगाबाद युवाचे मुख्य संपादक अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद (वय 58) राहणार बुढीलेन, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर यांचे घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. साप्ताहिक औरंगाबाद युवाच्या माध्यमातून समाजाला आपल्या लेखनातून न्याय मिळवून देण्याचे त्यांनी अनमोल योगदान दिले आहे. अब्दुल कय्यूम हे नेहमी पत्रकारीता व सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कोणत्याही क्षेत्रात कोणाला काही अडचण आली तर नेहमी धावून जात ते काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नसतं. काँग्रेस पक्षात सुध्दा त्यांनी विविध पदांवर काम करुन आपले स्थान निर्माण केले होते. व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेत सध्या साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून वर्तमानपत्रांची व पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले. व्हाईस ऑफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांना त्यांच्या निधनाची बातमी मिळाली त्यांनी शोक व्यक्त करून कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बुढीलेन येथील निवासस्थानी विविध राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी गर्दी केली आहे. त्यांची नमाज-ए-जनाजा बाद नमाज इशा जामा मस्जिद येथे अदा करुन दफनविधी चितेखाना कब्रस्तानात होईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक मुलगा, दोन मुली, नाती पोती असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?