ज्ञानेश कुमार यांना तात्काळ बडतर्फ करावे या मागणीसाठी शहरात मुकमोर्चा,धरणे, सत्याग्रह
ज्ञानेश कुमार यांना तत्काळ बडतर्फ करावे म्हणून शहरात मूक मोर्चा व धरणे सत्याग्रह....!!..
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेले घोटाळे लक्षात घेता राष्ट्रपतीने त्यांना तात्काळ बडतर्फ करावे म्हणून शहरातील परिवर्तनवादी पक्ष - संघटनांनी मूक मोर्चा काढून, गांधी पुतळ्यावर धरणे सत्याग्रह केला.
संविधान बचाव देश बचाव अभियान व अन्य परिवर्तनवादी संघटनांचे वतीने निघालेला मूक बाईक मोर्चा, पैठण गेट येथून सकाळी 11 वाजता, निघून गुलमंडी - रंगार गल्ली - सिटी चौक - सराफा मार्गे शहागंज येथील गांधी पुतळ्यावर गेला. या ठिकाणी 2 वाजेपर्यंत धरणे सत्याग्रह करण्यात आला.
देशातील सर्व निवडणुका निष्पक्षपातीपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार निवडणुक आयोगाचे गठण केले जाते.
मात्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर, निवडणूक आयोग स्थापन करण्याचे कायद्यातच बदल करून, मोदींना पाहिजे असाच कायदा करण्यात आला. निवडणूक आयोगातील सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांनी आपसात चर्चा करून घेणे अपेक्षित असतांना, ते तसे घेतले जात नाहीत, मुख्य निवडणूक आयुक्त मनमानेल त्या पद्धतीने निर्णय घेतात असा जाहीर आरोप, अन्य दोन आयुक्तांनी केल्यावर ( इंडियन एक्स्प्रेस मधील बातमी) संपूर्ण भारत व जगात खळबळ माजली आहे.
त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचे विरोधात देशभर आंदोलने सुरू झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा नसता त्यांना राष्ट्रपतींनी विनाविलंब बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.
आज गांधी जयंतीचे औचित्य साधून ज्ञानेश कुमार यांचे राजीनाम्याची तर मागणी होत आहेच पण त्यांचे कार्यकाळातील सर्व निवडणुका रद्द करून, त्यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रपती कडे केली आहे.
धरणे - सत्याग्रहाचे वेळी...
ज्ञानेश कुमार - - चले जाव..!!
ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करा..!!
SIR प्रक्रिया तत्काळ रद्द करा..!!
इत्यादी घोषणा यावेळी देण्यात आल्या..!!
मूक मोर्चा व धरणे सत्याग्रहात खासदार डॉ. कल्याण काळे, निवृत्त न्यायमूर्ती ऍड. डी. आर. शेळके, हमाल कार्यकर्त्यांचे नेते साथी सुभाष लोमटे, आयटकचे कॉ. अभय टाकसाळ, दलीत पँथर्सचे भाई रमेश खंडागळे, कॉ. भीमराव बनसोड, प्रो. मीर खान पठाण, प्रो. चंद्रकांत चव्हाण, प्रो. मच्छिंद्र गोरडे, प्रा. श्रीराम जाधव, संविधान प्रचारक अनंत भवरे, सुभेदार मेजर सुखदेव बन, साथी भाऊसाहेब पठाडे, डॉ. सुहास सीरशिकर, बशीरभाई, फरीद पठाण, साथी देविदास किर्तीशाही, साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव, साथी राजेंद्र जेधे, डॉ . लोकेश कांबळे, मधुकर गायकवाड, ॲड.उमेश इंगळे, ज्ञानेश्वर सोनूने, अरुण मते, राज गायकवाड, शेख अहमद, शेख पाशू, जफर खान, रफिक बक्ष इ. चा सहभाग होता.
या वेळी ज्ञानेश कुमार यांचे कार्यकाळात जर 13 कोटी लोकसंख्या मतदानातून बाद होत असेल तर हा या देशातील लोकांशी केलेला प्रचंड मोठा द्रोह आहे म्हणून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे या मागणी बरोबरच, त्यांच्या काळातील सर्व निवडणुका रद्द करा, अत्यंत दोषपूर्ण अशी SIR प्रक्रिया रद्द करा आणि ज्ञानेश कुमार यांचे कार्यकाळाची संपूर्ण चौकशी निष्पक्षपातीपणे करावी अशा मागण्या कर
ण्यात आल्या.
What's Your Reaction?