दीक्षाभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केले अभिवादन

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दीक्षाभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
नागपूर,दि.6(डि-24 न्यूज) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमी वरील स्तूपामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या अस्थीकलशाला पुष्पांजली अर्पण केली.
त्यानंतर दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
तसेच विधानभवन, नागपूर येथील तळमजल्यावरील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारानजीकदेखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पफुलं वाहून विनम्र अभिवादन केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते ,आमदार अजय चौधरी,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे उपस्थित होते.
What's Your Reaction?






