हिंगोली जिल्ह्यात सतीश चव्हाण यांच्या प्रचाराचा झंझावात... संवाद दौ-याला प्रतिसाद
हिंगोली जिल्ह्यात सतीश चव्हाण यांच्या संवाद दौऱ्याचा झंजावात...
प्रत्यक्ष भेटी घेऊन साधला संवाद...
हिंगोली, दि.13(डि-24 न्यूज)- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त संवाद दौऱ्या प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक, शिक्षक, पदवीधरांशी संवाद साधून येणाऱ्या 23 तारखेला माझ्या नावासमोर पहिल्या पसंतीक्रमांकाचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी विनंती महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी केली.
हिंगोली संवाद दौऱ्यात मंगळवारी जिल्हा परिषद, सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय, जिल्हा वकील संघ, श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, शिवाजी महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आदर्श महाविद्यालय, मुप्टा संघटना तसेच महायुतीचा मेळावा या ठिकाणी भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधला.
याप्रसंगी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, माजी आमदार व माझे मार्गदर्शक स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या संस्कारामुळे हिंगोली जिल्ह्यातील गुणवत्ता अधिक वाढली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभा आहे. हिंगोलीकरांनी मला नेहमीच साथ दिली असून यापुढीही सर्वजण माझ्या सोबत राहतील अशी अपेक्षा उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान बदलत आहे मात्र माझा संपर्क आजही गावातील प्रत्येक माणसाशी आणि पदवीधरांशी आहे. आणि हाच संपर्क मीं ठेवल्याने गेल्या 18 वर्षात मीं पदवीधरांसाठी काम करू शकलो. यापुढीही सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मीं आगामी काळात प्रयत्न करेल. यासाठी पुन्हा एकदा आशीर्वादरुपी पहिल्या पसंती क्रमांकाचे मत देऊन मला प्रचंड मताधिक्याने माराठवाडा पदवीधर मतदार संघातून निवडून द्यावे अशी विनंती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, जेष्ठ समाजसेवक खंडेराव सरनाईक, महेश थोरात, तालुका अध्यक्ष रवि डोरले, सुधाकर मेटकर, अमोल खिल्लारी, शिवराज सरनाईक, परसराम हिंबाडे, शेख रहीम, विश्वास वानखेडे, शंकर कऱ्हाळे, राजकुमार वायचाळ, पंडित शिरसाट, सुधाकर बल्लाळ, नरेश देशमुख, मुप्टा संघटनेचे अध्यक्ष, अमर मोरे, मईम सर शिवाजी मेटकर, ॲड. कोटकर, ॲड. अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?