एसआयआर प्रक्रीयेतील कथित अनियमितते प्रकरणी एमआयएम अक्रामक, चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी...

 0
एसआयआर प्रक्रीयेतील कथित अनियमितते प्रकरणी एमआयएम अक्रामक, चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी...

SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततेप्रकरणी एमआयएम आक्रमक; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13 (डी-24 न्यूज) : SIR प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या वतीने मंगळवारी, दि. 13 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार कक्षात आयोजित बैठकीत तक्रार मांडण्यात आली. यावेळी उपसहायक निवडणूक अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, निलेश अपहार आणि रुपेश सिंगारे यांच्यासमोर पक्षाचे जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी आपली भूमिका मांडली.

दि. 12 ऑक्टोबर रोजी भाजपचे BLO-2, BLA आणि सुपरवायझर यांच्यावर दबाव आणणे, धमकावणे तसेच दिशाभूल करणे, अशा प्रकारांद्वारे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितांची सुनावणी घ्यावी, तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी शारेक नक्शबंदी यांनी केली.

या प्रकरणात नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले, याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर लेखी उत्तर देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली.

यावेळी एमआयएम पक्षाच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपली तक्रार मांडून या विषयावर चर्चा केली. या बैठकीस एमआयएम पक्षाचे प्रदेश महासचिव तथा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्यासह पक्षाचे सर्व मनपा नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow