नितेश राणे यांच्या विरोधात रासूका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची तक्रार

 0
नितेश राणे यांच्या विरोधात रासूका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची तक्रार

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे त्यावर 'रासुका' अंतर्गत कारवाई करून महाराष्ट्र बंदी करावी - काँग्रेसची पोलीस आयुक्तांना तक्रार 

 छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) पोलीस आयुक्त यांना शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष यूसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आमदार नीतेश राणे यांच्यावर रासुका अंतर्गत गुन्हा नोंद करने करिता निवेदन देण्यात आले. भाजपा आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे कार्यक्रमात मुस्लिम समाजा बद्दल कथित वक्तव्य करून समाजा समाजा मध्ये तेढ़ निर्माण करण्याचे काम करत आहे. वारंवार राणे यांनी नेहमी दोन समाजात तेढ निर्माण करणारी आणि पोलीस यांच्या बद्दल बोलतानी खालच्या भाषेत बोलून आमचे रक्षक यांना सुद्धा आव्हान दिले. तसेच सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्याकडे नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याची तक्रार देण्यात आली.  

 यावेळी शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख यूसुफ शेख, रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉ जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण मोहन देशमुख, आकेफ रजवी, महिला शहर अध्यक्ष दीपाली मिसाळ, डॉ अरुण शिरसाठ,अनिस पटेल, इकबाल सिंग गिल, शेख अथर, डॉ. निलेश अंबेवाडीकर, मोईन ईनामदार, बबन डिडोरे, पाटील डॉ. पवन डोंगरे, शेख रईस, एम ए अझर, मसरूर सोहेल खान, संतोष भिंगारे, सलीम शेख अजमत खान, जुल्फीकार खान, शिला मगरे, इरफान पठाण, प्रमोद सदाशिवे, शफिक शहा, हकीम पटेल, सयद फैयाजोददीन, शेख इफतेखार इंजिनियर, रवि लोखंडे, लतिफ पटेल, जमील खान, मो जकिर मजाज खान, सलमान खान, जाफर खान, सोनु पाईकडे योगेश बहादुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow