पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

 0
पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासांची सवलत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज ):- भारत निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या 16 ऑक्टोबर 2026 रोजीच्या सुधारित पत्रानुसार, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,‌अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 135 ब नुसार ही भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष रजा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. ही रजा केवळ संबंधित मतदारसंघातील मतदार असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू असणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील, याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

दरम्यान, ही विशेष नैमित्तिक रजा खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. मात्र, मतदान केंद्रांचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवासाचा वेळ लक्षात घेता, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow