पवित्र हज यात्रेसाठी जाणा-या यात्रेकरुंचे हज हाऊसमध्ये प्रशिक्षण संपन्न...
पवित्र हज 2026 यात्रेसाठी जाणा-या यात्रेकरुंचे प्रशिक्षण शिबिर संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) - ख़िदमाते हुज्जाज कमिटी यांच्या वतीने पवित्र हज 2026 यात्रेसाठी पुरुष व महिला आजमीन-ए-हज यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रशिक्षण शिबिर रविवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी क़िले अर्क येथील हज हाऊस येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडले.
या प्रशिक्षण शिबिरात सहभागी सर्व आजमीन-ए-हज यांना ओळखपत्र (आय-कार्ड) वितरित करण्यात आले. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रशिक्षण सत्रात प्रवेश देण्यात आला नाही.
कार्यक्रमाची सुरुवात जामा मशीदचे इमाम व खतीब हाफिज़ झाकीर साहेब यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली, तर हाफिज़ मोहम्मद मुस्तफा यांनी नात सादर केली. यानंतर ख़िदमाते हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष व जामिया इस्लामिया काशिफ़ुल-उलूमचे संरक्षक अलहाज मौलाना मुहम्मद नसीमुद्दीन मिफ़्ताही यांनी उद्घाटनपर भाषणात हजचे महत्व व फजिलत स्पष्ट केली.
यानंतर सय्यद अरशद इंजिनीअर यांनी हजच्या पाच दिवसांबाबत सविस्तर व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. डॉ. मोहंमद रहीमुद्दीन यांनी वैद्यकीय तपासणी, लसीकरण व फिटनेस प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण सत्रात 733 पुरुष व 708 महिला, अशा एकूण 1541 आजमीन-ए-हज यांनी सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यासह बुलढाणा, जालना, अहमदनगर, लातूर, बीड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) व नांदेड आदी जिल्ह्यांतील आजमीन-ए-हज यांनीही प्रशिक्षणात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसर अली बेग व अब्दुल बारी पटेल यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ख़िदमाते हुज्जाज कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मिर्झा रफत बेग, उपाध्यक्ष सय्यद अझीझ कुरेशी, डॉ. रहीमुद्दीन, मिर्झा अफसर बेग, तसेच कार्यकारिणी सदस्य नूरुद्दीन अंसारी आदींनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हज हाऊसचे प्रशासकीय अधिकारी अब्दुल बारी पटेल व मुहम्मद ज़कीउद्दीन सिद्दीकी यांनी हज हाऊसची सर्व व्यवस्था उत्तमरीत्या पार पाडली. त्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
What's Your Reaction?