पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, पंचनामे करण्याचे निर्देश
पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; पंचनामे करण्याचे निर्देश....
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2 (डि-24 न्यूज)- जिल्ह्यात गेल्या 24 तासांहून अधिक कालावधीसाठी संततधार पाऊस सुरु असून अतिवृष्टिमुळे शेतीत पाणी साचणे, नद्या नाल्यांना पूर येणे यांच्या सह काही ठिकाणी नुकसानी झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात आज सकाळी राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालगाव, पिंपळगाव ता. फुलंब्री या शिवारांमध्ये पाहणी केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी निलम बाफना तसेच पालगाव सरपंच जया जाधव तसेच स्थानिक नागरिक व शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले
.
What's Your Reaction?