प्रभाग क्रमांक 12 च्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे आवाहन...
प्रभाग क्रमांक 12 मधील चारही काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या - पांडुरंग तांगडे पाटील
मतदारांचा प्रचारात प्रतिसाद बघता आजच सर्व उमेदवार निवडून आले असल्याची परिस्थिती - तांगडे पाटील
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.10(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेसने उच्चशिक्षित व अनुभवी आणि नेहमी जनतेच्या सेवेत तत्पर असलेले उमेदवार दिले आहे. प्रभागात नगरसेवकांनी कामे केली नसल्याने जनता त्रस्त आहे. रस्त्यावर ड्रेनिजचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. नळाला दुषित पाणी येते, पाणी नळाला दहा दिवसांनंतर येते त्यासाठी रात्री महीलांना जागावे लागते. कटकट गेट येथील ख्वाजा गरीब नवाज रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध नाही. एक्सरे, प्रसुती वार्ड सुरू करण्यात आले नाही. अंतर्गत रस्ते खराब झाले. रहेमानिया काॅलनी येथील शादीखाना बंद आहे. महापालिका शाळेत दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. युवकांमध्ये स्किल्स आहे पण हाताला काम नाही. महीला सुरक्षा व घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मागिल महापालिका निवडणुकीत ज्या नगरसेवकांना निवडून दिले त्यांनी काम केले नाही. आता या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर आता एकच पर्याय आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला काँग्रेसचे उमेदवार इब्राहीम पटेल यांच्या सह तीन उमेदवार या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन किराडपुरा, पानी बंबा रोड येथे आयोजित काॅर्नर मिटींगमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जमील खान, रमजानी खान, सहिर खान, ताहेर पटेल, इस्माईल पटेल, रफीक पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल, आरेफ शेख, नईम शेख, आसेफ शेख, श्रीराम इंगळे, अब्बु पटेल सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, खालिक देशमुख, शेख हुजुर, शेख अस्लम, बिस्मिल्ला खान, जाकेर पटेल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?