फुलंब्री तील गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई

 0
फुलंब्री तील गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई

फुलंब्रीतील गुन्ह्यातील दोन आरोपींना 24 तासांत अटक...

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांची कारवाई; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- : फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते.

फुलंब्री येथे 20 ऑक्टोबर 2026 रोजी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, 2023 मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना 24 तासांच्या आत अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी :

रामदास महादू तरटे (वय 54 वर्षे), रा. बाबुळगाव तरटे, हनुमान मंदिर परिसर, स्वामी विवेकानंदनगर, फुलंब्री.

उत्तम भागाजी ढोके (वय 54 वर्षे), रा. गिरिजानगर, फुलंब्री.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, पोलीस उपअधीक्षक सोनाली पाईकराव, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, दिनकर पांढरे आणि कौतिक चव्हाण यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow