बंदीजनांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रम राबवावे - न्या.नितीन सुर्यवंशी

 0
बंदीजनांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रम राबवावे - न्या.नितीन सुर्यवंशी

धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मध्यवर्ती कारागृहाला

वैद्यकीय उपकरणांचे दान; राज्यातील पहिलाच उपक्रम...

बंदीजनांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रम राबवावे- न्या.नितीन सूर्यवंशी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19 (डि-24 न्यूज)- बंदीजनांच्या शारिरीक आरोग्यासोबतच त्यांचे मानसिक आरोग्य व कौशल्य विकासासाठी कारागृह प्रशासनाने उपक्रम राबवावे. जेणेकरुन ते कुशल आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून समाजात परत गेले पाहिजे,असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी आज केले.

 येथील धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेत बंदीजनांच्या विविध आरोग्य चाचण्यांसाठी लागणारे वैद्यकीय उपकरणे आज मध्यवर्ती कारागृहाला दान करण्यात आले. यानिमित्त बंदीजनांसाठी आरोग्य तपासणी व निदान शिबिरही आयोजीत करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘लोकसंवाद’ या सहयोगी उपक्रमात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रमही पार पडला.

 न्या. नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. धर्मादाय सह आयुक्त नितीन जाधव, धर्मादाय उपायुक्त उषा चव्हाण-पाटील, सहा. धर्मादाय आयुक्त प्रभू कापडे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत वरुडीकर, खंडपीठाचे प्रबंधक उमाकांत देशमुख, राजेश सासने, अच्च्युत कराड तसेच सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, वैद्यकीय पथक आदी उपस्थित होते. 

 न्या. सूर्यवंशी आपल्या संबोधनात म्हणाले की, बंदीजनांच्या आरोग्यासाठी एखाद्या कारागृहाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणे आणि सहसाहित्य देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा. या सुविधांमुळे कारागृह प्रशासनाला बंदीजनांना वैद्यकीय सुविधा व उपचार उपलब्ध करुन देणे सोईस्कर होईल. बंदीजन हे शिक्षा भोगत असले तरी त्यांचे मानवी हक्क, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा मुलभूत अधिकार अबाधित आहेत. त्याचे रक्षण करणे हे समाजाचे आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचेही कर्तव्य आहे. 

 न्या. सूर्यवंशी पुढे म्हणाले की, कारागृह प्रशासनाने बंदीजनांच्या शारिरीक आरोग्याची काळजी घेतांनाच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठीही उपक्रम राबवावे.त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करावा. जेणे करुन शिक्षा कालावधी पूर्ण केल्यानंतर ना ते एक कुशल आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून समाजात परततील. न्या. सूर्यवंशी यांनी बंदीजनांना उद्देशून सांगितले की, एखाद्या चुकीमुळे आपण गुन्हेगार ठरले असलात तरी चुक सुधारण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आणि संधी आहे. भूतकाळातील चुका सुधारुन आजच्या प्रयत्नांनी आपले भविष्य घडवावे.

 प्रास्ताविक कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी केले. धर्मादाय सह आयुक्त नितीन जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आरोग्य सुविधा तसेच धर्मादाय म्हणून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सेवा ही तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सहभागी संस्था आणि आरोग्य सेवा...

  आजच्या या उपक्रमात महात्मा गांधी मिशन रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, एम.आय.टी. रुग्णालय, एम.एम.आर.आय. कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद चिकलठाणा लायन्स आय हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, बी.एस.पी. मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, इंडीयन मेडीकल असोसिएशन या संस्थांनी या उपक्रमात सहयोग दिला. यावेळी आयोजीत आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, कर्करोग निदान, कान नाक घसा आणि डोळे तपासणी, महिलां करीता कॅन्सर विषयक पॅप स्मीअर तपासणी, मूळव्याध, त्वचारोग तपासणी, डोळ्यांकरीता मोतीबिंदू तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी,सी.पी.आर. चाचण्या करण्यात आल्या.

 ग्लोबल फाऊंडेशन, सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्ट, मानव विकास कल्याण प्रतिष्ठान, परिपूर्ती मेडीकल फाऊंडेशन,इंडियन इन्स्टिट्युट फॉर रुरल डेव्हलपमेंट, भाऊराया फाऊंडेशन, फैज ए आम ट्रस्ट अशा विविध धर्मादाय संस्थांनी विविध वैद्यकीय उपकरणे व सहसाहित्याचे दान केले. या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्या

त आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow