भाजपाचे नेते हाजी एजाज देशमुख यांचे दु:खद निधन, आज रात्री बीड येथे दफनविधी...
भाजपाचे नेते हाजी एजाज देशमुख यांचे दु:खद निधन, बीड येथे आज रात्री दफनविधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - बीड येथील रहिवासी भाजपाचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांचे एपल हाॅस्पिटल येथे नुकतेच उपचारादरम्यान मृत्यू झाले. मागिल काही वर्षांपासून ते किडनी विकाराने ग्रस्त होते. त्यांचे वय 55 वर्षे होते. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे ते कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न केले होते. जीवनभर त्यांनी भाजपात सक्रीय भुमिका निभावली. त्यांच्या निधनाने भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर पक्षात काम केले. सेंट्रल हज कमिटी व राज्य हज कमिटी सदस्य पदावर असताना त्यांचे हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांच्या सेवेत अमुल्य योगदान राहिले. छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस येथून हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांना पाठवण्यासाठी प्रयत्न केला. संघटन मंत्री म्हणून त्यांनी पक्षात काम केले. त्यांचा दफनविधी कार्यक्रम आज रात्री दहा वाजता बीड येथील त्यांच्या निवासस्थानी शहेनशहा नगर येथे होईल. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात 3 भाऊ, 3 बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे
.
What's Your Reaction?