भाजपा खासदार विधुडी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, विभागीय आयुक्त यांना निवेदन

 0
भाजपा खासदार विधुडी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, विभागीय आयुक्त यांना निवेदन

भाजपा खासदार विधुडी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, विभागीय आयुक्त यांना निवेदन

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) दोन समाजात तेढ निर्माण करणे व देशात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य दिल्लीचे भाजपाचे खासदार रमेश विधुडी यांनी नवीन संसदेत काही दिवस अगोदर दिले. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी कायदे बनतात अशा पवित्र ठिकाणी जाती पातीवर, खालच्या स्तरावर वक्तव्य करणे हे एक जवाबदार खासदारांना शोभा देत नाही. भाजपाने अशा खासदाराला निलंबित करुन कधीही निवडणूक लढू नये अशी कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या मार्फत निवेदन पाठवून महाराष्ट्र जनजागरण समितीने बिधुडी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.

तत्पूर्वी जीन्सी पोलिस ठाण्यात निरीक्षक यांना लेखी तक्रार देऊन खा.रमेश बिधुडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

याप्रसंगी जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, माजी नगरसेवक एजाज जैदी, शेख मुनाफ, शमशाद बेगम, फजलूल्लाह खान, मुफ्ती मिनाज, शेख शाकेर, मौलाना इरफान, मुजाहिद खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow