मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटींची तरतूद - उद्योगमंत्री उदय सामंत
मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद- उद्योगमंत्री उदय सामंत... छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ), दि 27(डि-24 न्यूज ) मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरिव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमास पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक आकौफ मंत्री अब्दुल सत्तार राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मलिक नेर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संभाजीनगरचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे. उद्योगाचे उपसंचालक बी. टी. यशवंते यांच्यासह उद्योग विभागातील मराठवाड्यातील सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी विविध योजनांचे लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. उदय सामंत पुढे म्हणाले औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षाच्या दृष्टिकोनातून उद्योजकांना निर्भय आणि विश्वास पूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याबरोबरच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरक्षा देण्यात देण्यात येईल. उद्योगांच्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा वीज यासाठी केलेले काम हे उल्लेखनीय असून उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लुब्रिझॉल, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू ,किर्लोस्कर टोयाटो या प्रकल्पांना कार्यरत करण्यात आले. शासन, जनता आणि उद्योजक यावरील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी उद्योगाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून, शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम शासनाने केलं असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की उद्योगाच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन उद्योजकांच्या पाठीशी असून त्यांच्या निर्भय वातावरण देण्याबरोबरच विकासासाठी आवश्यक असणारे काम शासन करीत आहे. उद्योग विभागासाठी एक खिडकी योजना, व मित्राच्या मार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले. शहरी भागातील उद्योगाप्रमाणेच ग्रामीण भागातील लघुउद्योजकाला पाठबळ देण्यात येत असून यातून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासातून आर्थिक विकास साध्य होईल. यासाठी शासन उद्योजकांना आर्थिक मदत, संरक्षण ,सुविधा व इतर पायाभूत सुविधांमध्ये मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे म्हणाले की छत्रपती संभाजी नगर हे औद्योगिक क्षेत्रात ऑटो क्लस्टर हब म्हणून जागतिक पातळीवर ओळखलं जात आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि विविध आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रकल्पाची गुंतवणूक छत्रपती संभाजी नगर शहरात झाल्यामुळे खऱ्या अर्थाने औद्योगिक विभागाची विकासाची भरारी होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उद्योजक ऑक्टोबर 2024 या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले, तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना याचबरोबर इतर योजनेच्या लाभार्थी यांना धनादेशाचे वाटप , प्रमाणपत्र, सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मलिक नेर यांनी केले.
What's Your Reaction?