महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियन वक्फ मालमत्तेच्या स्वरक्षण व संवर्धनासाठी काम करणार - मोईन इनामदार
महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियन वक्फ मालमत्तेच्या स्वरक्षण व संवर्धनासाठी - मोईन इनामदार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियनची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील वक्फ मालमत्तेच्या स्वरक्षण व संवर्धनासाठी मुतवल्लींच्या सहकार्याने कायद्याच्या चौकटीत राहून करणार आहे. वक्फ मालमत्तेवर अवैध अतिक्रमण काढण्यासाठी वक्फ बोर्डाकडे केली जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत युनियनचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी दिली आहे.
त्यांनी सरकारकडे यावेळी विविध मागण्या केल्या ते पूर्ण झाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील साडेचार लाख हेक्टरवरहून अधिक देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार असून महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियनचा विरोध आहे. देवस्थानचे इनामी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दि.15/4/2025 व तसेच सर्वोच्च न्यायालय यांचा आदेश दि.24/4/2026 रोजी देवस्थान इनामी जमीनीचा आदेश आलेला आहे. मराठवाडा मध्ये इनामी जमीनीला कुळ कायदा लागू होत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन ते बदलू शकत नाही. वक्फ बोर्डाच्या बैठकीत वडिलोपार्जित मुतवल्ली नेमणूक करणे व वक्फ बोर्डाचे नोंदणी, नुतनीकरण तात्काळ करणे , वक्फ बोर्डाने बेकायदेशीर पणे कमेटी बनवून चुकीच्या पद्धतीने कमेटी रद्द करण्यात यावी. इनामदार मुतवल्ली यांना वारस हक्कासाठी उपविभागीय अधिकारी (आयतीत) या विभागाने भरपूर प्रकरण प्रलंबित आहेत. त्याकरीता वक्फ बोर्डाने आपल्या कार्यालयात अतियात जिल्हा अधिकारी विभागाचा सेक्शन उपलब्ध करण्यात यावे. राज्यातील देवस्थान इनामींवर झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत मोईन इनामदार यांनी केली आहे.
यावेळी खुलताबादचे मुतवल्ली सलिमोद्दीन चिश्ती, टाऊन हॉलचे हसनोद्दीन शेख, जालन्याचे काजी सोहेल, जामखेडचे नदीम कादरी, पैठणचे शाहरुख रहेमत शेख उपस्थित होते.
What's Your Reaction?