महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 0
महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यानंतर देवयानी पाटील डोणगावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला.

यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे,खासदार डॉ. कल्याण काळे, उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, नवीन ओबेरॉय तसेच विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow