मार्टी स्थापनेसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन
मुंबई, दि.2(डि-24 न्यूज शासनाची स्वायत्त संस्था, MARTI सुरु करण्याची राज्य सरकारने घोषणा केली परंतु अद्यापपर्यंत शासन आदेश काढून अंमलबजावणी करण्यात आली नाही यासाठी औरंगाबाद येथील मार्टी कृती समीतीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशन (डिसेंबर2023-नागपुर) येथे घोषणा करण्यात आलेल्या मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रैनिंग इन्स्टिटयूट & ह्यूमन डेव्हलोपमेंट (मार्टी) स्थापनेसाठी आगामी महाराष्ट्र विधिमंडळाचे होणा-या पावसाळी अधिवेशनात निर्णय मंजुर करणे बाबत घोषणा केली.
गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याच्या जनते कडुन (मार्टी) स्थापने ची मांगणी विविध आंदोलन, लक्षवेधी, निवेदन देऊन, पत्र सादर करून, पत्रकार परिषद करून होत आहे. मंत्रीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषद मधील अनेक आमदार तसेच विरोधी पक्षनेते यांनी महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक तरुणांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासाच्या कार्यक्रमा मध्ये समानता आणण्यासाठी (मार्टी) मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रैनिंग इन्स्टिटयूट & ह्यूमन डेव्हलोपमेंटची अत्यंत आवश्यकता दाखवून मांगणी केलीली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री व अनेक मंत्री महोद्यांचीही मार्टी स्थापने बाबत सकारात्मक भूमिका आहे. 18 डिसेंबर 2023 नागपुर येथे'अल्पसंख्याक हक्क दीन' निमित्त मार्टी स्थापनेची घोषणा करु."असे अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी विधान परिषेदत लक्षवेधी सूचनेचे उत्तर देत सांगितले होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालया अंतर्गत बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी, अमृत अशा विविध मागास समाजातील तरुणांच्या सर्वांगिण विकासासाठी ह्या योजना व कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे ह्या चढवढी दरम्यानच महाराष्ट्र सरकार ने MAARTI ही स्वायत्त संस्था स्थापणेला मंजुरी दिली आहे, मात्र (मार्टी) स्थापणेस दिरंगाई का होत आहे ? ही चिंतेची बाब होय.
तरी आपणांस विनंतीपुर्वक अर्ज की येणार्या अधिवेशनात आपल्या परीने (मार्टी)स्थापण करण्यास. एका स्वायत्त संस्थे च्या माध्यमातून मागास व अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व तरुणांसाठी किती मुबलक कार्यक्रम राबवण्यात येते हे निम्न प्रकारच्या योजने द्वारे आपल्याला कळेल.
1. शासकीय UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये सहभाग वाढविण्यास उतेजन देणे.
2. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण देणे.
3 महाराष्ट्र न्यायिक सेवा दिवाणी न्यायधीश कानिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे.
4 अधिछात्रवृती योजना 200 अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी संख्या निश्चित करणे.
5 INSTITIUTE OF BANKING PERSONNEL SELECTION IBPS PO IBPS CLERK स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणे.
6.पोलिस भरती/अर्धसैनिक बल,आमर्डफोर्स,पॅरामिल्ट्री फोर्स प्रशिक्षण योजनेचे स्वरूप निवासी व तसेच त्या मध्ये मराठी भाषे बाबत प्रशिक्षण देने.
7. MS-CET, NEET,JEE मेडिकल ई. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, निशुल्क प्रशिक्षण देणे.
8 इयत्ता 10 वी मध्ये 90% जास्त गुण मिळालेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुदान योजना राबविणे. पुरसकाराची रक्कम रु 200 000/- करणे
9. परदेशी भाषा अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ति योजना महराष्ट्रातील universities/ institutions मान्यता प्राप्त अनुदानित संस्था , महविद्यालयातिल परदेशी भाषा (जर्मन,जपानी,स्पॅनिश,फ्रेंच,चीनी,रशियन,पोर्तुगीज, व इतर भाषा इंग्रजी वगळून) पदवी/पदवीउत्तर पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थीसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ति योजना लाभ देणे
10 परदेशी शिष्यवृती योजना राबविणे क्यूएस वर्ल्ड रॅन्कींगमधील २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी 50 पात्र विद्यार्थ्यांना परदेशातील शिष्यवृत्ती योजना राबविणे.
11. कौशल्य विकास उपक्रम राबविणे तर्फे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना केंद्रावर एकूण ६८ अभ्यासक्रम उपलब्ध करून , प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने राबविणे.
12. केंद्र शासनाच्या NMMS शिष्यवृती गुणवत यादीत असलेल्या मात्र शिष्यवृती न मिळालेल्या 9 वी तील विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी 12,000 रु शिष्यवृती देणे.
13. 18 ते 50 वयोगटातील पात्रताधारक शेतकरी युवक यूवतींना राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) द्वारा विनाशुल्क प्रशिक्षण देणे.
14. शेतकरी क्षमता बांधणी प्रकरचे प्रशिक्षण 10 कार्यक्रम राबविणे
15. इंडो जर्मन टूल रूम IGTR कोर्सचे 18 ते 35 वयोगटातील युवक व युवतींना निशुल्क प्रशिक्षण देणे.
16. स्वाधार /स्व्यमं /निर्वाह भत्ता योजना राबिवेने . अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करणे विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करणे.
17. योजना जनसामान्यां पर्यन्त पोहोचविण्याकरिता त्यासाठी प्रचार प्रसीद्धी करण्याकरिता समतादूत, तारादूत प्रकलप राबविणे........
18. IIT ,IIM , आयटी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य करणे
आदरणीय आपणास नक्की कळले असेल की 'मार्टि कृती समिती महाराष्ट्र' सदर विषयी वाजबी व अतिआवश्यक मागणी सरकारशी सलग तीन वर्षांपासुन करित आहे. तरी समाजकार्याच्या ह्या बहुमुल्य उपक्रमा विषयी आपण ही मागणी मार्गी लावावी.
धरणे आंदोलनात अध्यक्ष ॲड. अझर पठाण,
उपाध्यक्ष सर आसिफ,
एडवोकेट वसीम कुरेशी विधी सल्लागार,
एड साहेब पठाण मुंबई,
सय्यद नबील्लूजमा बीड,
प्रो. पठाण समीउल्ला खान परभणी,
हबीब शेख चंद्रपूर,
शेख सलीम,
डॉ. असलम बेग नागपूर,
मोहम्मद मोहसीन शेख अंधेरी, अश्रफ पठाण परभणी, अरबाज पठाण मुंबई, शेख मतीन, अज्जू शेख, अनिस रामपुरे,
निकम बीके, जब्बार खान,
फरान खान,मोहम्मद खलील व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?