मोईन शेख हर्सुलकर यांची काँग्रेसच्या शहर सरचिटणीस पदी नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव
मोईन शेख हर्सुलकर यांची काँग्रेसच्या शहर सरचिटणीसपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2 (डि-24 न्यूज) :-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने शहर जिल्हा काँग्रेसची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोईन शेख हर्सुलकर यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नव्या कार्यकारिणीमार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मोईन शेख हर्सुलकर हे गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची विविध कामे मार्गी लावण्याबरोबरच शहरातील अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या ते एम.एस.डब्ल्यू. (सामाजिक कार्य) पदव्युत्तर पदवीधर तसेच बी.जे. (पत्रकारिता) पदवीधारक आहेत. ते 'साप्ताहिक चौफेर औरंगाबाद नगरी' या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी दोन वेळा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मोईन शेख हर्सुलकर यांच्या नियुक्तीबद्दल खासदार डॉ. कल्याण काळे, महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, जिल्हाध्यक्ष डॉ. किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, माजी शहराध्यक्ष युसूफ शेख, इब्राहिम पठाण, असदुल्ला शकील, जमील अहमद खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?