उद्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक...! ४१ उमेदवार मैदानात

 0
उद्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक...! ४१ उमेदवार मैदानात

उद्या पदवीधर मतदार संघ निवडणूक; 41 उमेदवार मैदानात 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.22(डि-24 न्यूज)- 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि.23 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली आहे. आज दिवसभर मतदान साहित्य घेऊन मतदान चमू आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले.

विधान परिषदेच्या 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 23 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 (अखंड) अशी मतदानाची वेळ आहे. 

842 मतदान केंद्रांवर मतदान...

5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. 842 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 5 औरंगाबाद विभाग मतदार संघात 41 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूकीसाठी एकूण 3 लाख 26 हजार 701 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 77 हजार 717 महिला, 2 लाख 48 हजार 971 पुरुष आणि 13 इतर असे मतदार आहेत. 

मनुष्यबळ तैनात...

या निवडणूकीसाठी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून त्यात 935 केंद्राध्यक्ष व 2814 मतदान अधिकारी आहेत. मंगळवार दि.27 रोजी वुडस्टर्म डेकार एमआयडीसी चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 4455 अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

निवडणूक निरीक्षक व मदत कक्ष...

या निवडणूकीचे निरीक्षक म्हणून श्रीमती माधवी खोडे- चावरे यांची नियुक्ती आहे. तर रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9822366519 असा आहे. या निवडणूकीतील मतदान हे मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार असते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मदत कक्ष तयार करण्यात आला असून त्याचा क्रमांक 0240-2343164 असा

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow