लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची आमदार विक्रम काळे यांची मागणी

 0
लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची आमदार विक्रम काळे यांची मागणी

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या

 रस्ते वाहतुक मंत्री गडकरी यांच्याकडे आ. विक्रम काळेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज): नांदेड, लातूर, धाराशिव(उस्मानाबाद), बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने आणि विशेषत: मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रास जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या टेंभूर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी राष्ट्रीय महामार्ग चौपरीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लातूर-मुरूड-ढोकी-येडशी-बार्शी-कुर्डुवाडी-टेंभूर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची घोषणा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. या महामार्गासाठी निधीची घोषणा सुध्दा करण्यात आली. त्यानुसार चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. लातूर शहर ते 12 नंबर पाटीपर्यंत जून्या चौपदरीकरण रस्त्याची सुधारणा करण्याचे सुरू झालेले काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, 12 नंबर पाटी ते मुरूड अकोल्यापर्यंत यापूर्वी झालेल्या चौपदरीकरण रस्त्यावरील चारही अरूंद पुलाचे मंजूर झालेले काम पुर्ण करावे, मुरूड अकोला ते बोरगांव (काळे) करकटापर्यंत 11 किलोमिटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 7 मिटर रूंदीचे काम मंजूर आहे. त्याऐवजी ७ मीटर रुंदीचे चौपदरीकरणातील एक बाजू काम करण्यासाठी वाढीव निधीसह केंद्र शासनाची मंजूरी द्यावी, लातूर ते येडशीपर्यंत भुसंपादनाच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मंजूरी द्यावी, मुरूड अकोला ते येडशीपर्यंत व पुढे केलेल्या सुधारित विकास आराखडा प्रस्तावास (डीपीआर) मंजूरी देण्याची मागणी आ. विक्रम काळे यांनी केली आहे.

----

औट्रम घाट रस्ता बोगद्यातून करावा

राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेवरील कन्नडनजीकच्या औट्रम घाट जडवाहतुकीसाठी बंद आहे. घाट जड वाहतुकीस बंद असल्यामुळे जिल्ह्यासह कन्नड तालुक्यातील अर्थकारणाला ब्रेक लागला आहे. कसाबखेडा फाट्यावरून शिऊर बंगला ते येवला-नांदगावमार्गे वाहतूक सध्या सुरू आहे. १२० किलोमिटरचा हा फेरा मारून चाळीसगावमार्गे धुळे हायवेला जावे लागते. यात वेळ आणि इंधनाचा तोटा होत आहे. औट्रम घाटातील रखडलेले बोगद्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. औट्रम घाटातील बोगदा वगळता महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. औट्रम घाट रस्ता बोगद्यातून करण्यासंदर्भात सर्वेक्षण सुध्दा झालेले आहे. तपासण्या झाल्यात परंतू, अंतिम निर्णय झालेला नाही. वाहनधारकांची गैरसोय टाळण्याबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यातील अर्थकारणाला गती देण्यासाठी कन्नड-चाळीसगावला जोडणारा औट्रम घाट रस्ता बोगद्यातून करण्याची मागणी आ. काळे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow