लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे झळकले पोस्टर...!
 
                                लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे झळकले पोस्टर...!
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष, संघटनांची गर्दी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) आज लोकशाहिर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी वेगवेगळ्या व्यासपीठावरुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
याप्रसंगी राहुल भाऊ गवळे व युवकांच्या वतीने पुतळ्यासमोर भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रदान करण्यात यावे असे पोस्टर झळकले. मागील अनेक वर्षांपासून सरकारकडे हि मागणी करण्यात येत आहे. यावेळी जयकिशन भाऊ कांबळे, राहुल गवळे, इंजि. शैलेश चाबुकस्वार, संदीप बोराडे, दिपक बन्सवाल, राजू दाभाडे, सूरज कांबळे, सोनू बन्सवाल व छावणीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            