शंभर फुट डिपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

 0
शंभर फुट डिपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

शंभर फूट डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने हिमायत बाग चौक परिसरातील अतिक्रमणे निष्काशीत करण्यात आली.

दिल्ली गेट ते आझाद कॉलेज, उद्धवराव पाटील पुतळा चौक या ठिकाणी चाऊस कॉलनी जटवाडा कडे जाणाऱ्या शंभर फूट डीपी रस्त्यावर चार दहा बाय बारा या आकाराच्या अनधिकृत लोखंडी टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. या ठिकाणी मागील काही दिवसापासून अनाधिकृत टपऱ्या टाकण्याचे काम सुरू होते. सदर टपरी कोण टाकत आहे अतिक्रमण कोण करत आहे याबाबतची माहिती घेण्यास गेले असता कोणीही समोर येत नव्हते म्हणून सदर टपऱ्यांचा एकतर्फी पंचनामा करून आज जेसीबीच्या साह्याने निष्काषित करण्यात आले.

 हिमायत बाग ते चाऊस कॉलनी पुढे जटवाडा पांडे फार्म हाऊस कडे जाणाऱ्या 100 फूट डीपी रस्ता आहे याच ठिकाणी मागील वर्षी एप्रिल महिन्यात हे अतिक्रमण पूर्ण निष्काशीत करण्यात आले होते. परंतु मागील 15 ते 20 दिवसापासून कोणीतरी अज्ञात व्यक्ती या ठिकाणी मातीचा भराव टाकून लोखंडी टपरीचे अतिक्रमण करत होती. याबाबत आयुक्तांच्या आदेशाने मा. अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळेस याठिकाणी पाहणी करण्यात आली .परंतु कोणीही कोणाचं नाव सांगण्यास तयार नव्हते.हे लोक सुट्टीच्या दिवशीचा फायदा घेऊन अतिक्रमण करत होते. या ठिकाणी सध्या महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम ही हाती घेण्यात आले आहे .या टपऱ्या मुळे अडथळा होत होता. तसेच याच्याच बाजूला पार्किंगच्या एरियामध्ये पंधरा बाय पंधरा ताडपत्री शेड मध्ये चायनीज सेंटर सुरू केले होते तेही निष्काशीत करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर अतिक्रमण झाले होते. या टपऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघात पण होत होते. आयुक्तांच्या परवानगीने आज सकाळी जेसीबीच्या साह्याने चार टपऱ्यासह पंधरा बाय पंधरा चा शेड निष्कासित करून किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर याच पथकाने टीव्ही सेंटर येथील जय जिजाऊ चौक संभाजी महाराज पुतळा लगत रस्त्यावर बसणारे फुल विक्रीचे अतिक्रमण हटवले. ज्यांनी दुकानासमोर मोठे ओटे काढले होते अशा लोकाविरुद्ध कारवाई करण्यात आली .यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांचे ही पथक सोबत होते. या अतिक्रमण हटाव कारवाई मुळे टीव्ही सेंटरचा रस्ता बऱ्यापैकी मोकळा करण्यात आला आहे. या वेळी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक विभाग अशोक थोरात यांनी कारवाईच्या वेळी भेट दिली व रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. व त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना ज्यांनी समोर शेड काढलेले आहे यांचे रस्त्यावर गाळे आहे त्या नागरिकांची चर्चा केली व सदर चौक अतिक्रमणमुक्त कसा होईल याबाबत त्यांच्या मार्गदर्शन केले .यानंतर दुपारी तीन वाजता एम्स हॉस्पिटल हडको प्यासा वाईन शॉप समोर हॉस्पिटलचे प्रशासकीय काम करणारे अधिकारी यांनी हरित पट्ट्यामध्ये अतिक्रमण करणे बाबत लोखंडी पोल लावण्याचे काम हाती घेतले होते याबाबत माहिती मिळताच आयुक्तांचे आदेशाने कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी अशोक गिरी झोन क्रमांक चार ,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी व शहर वाहतूक शाखेचे पोलीस यांनी कारवाईत सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow