शहरात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई, 2 लाख 53 हजार रुपयांचा एमडी ड्रग्स जप्त
अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई; 2 लाख 53 हजार 870 रुपयांचा एम.डी. जप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.18 (डि-24 न्यूज) : अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या गुन्हे शाखेने कारवाई करत 51 ग्रॅम 29 मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ जप्त केला. या अंमली पदार्थाची किंमत तब्बल 2 लाख 53 हजार 870 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 10 वाजता अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारळीबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी इसम नावाच्या नदीम इब्राहिम शेख (वय 40, व्यवसाय-खाजगी व्यवसाय, रा. उमर टॉवर, 5 वा मजला, गणेश कॉलनी, आयकॉन हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर) याच्याकडून विक्रीसाठी आणलेला 2 लाख 53 हजार 870 रुपये किमतीचा 51 ग्रॅम 29 मिलीग्रॅम एम.डी. ड्रग्ज जप्त केला.
तसेच नदीम शेख याने सदर ड्रग्ज इसम नावाच्या जाकीर झवेरी, रा. बांद्रा, मुंबई याच्याकडून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद तसेच पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उद्रेश्वर मुंडे, पोहे/भासिंग चव्हाण, पोहे/नारायण पायघन, पोअं/सतीश जाधव, मपोअं/छाया लांडगे, पोअं/देशराज मोरे, पोअं/सरताज पठाण, पोअं/विशाल मेटे, चालक पोअं/विठ्ठल पवार व अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.
दरम्यान, शहरात कोठेही अंमली पदार्थांची विक्री अथवा नशा होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास 9684702002 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेशाद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
What's Your Reaction?